AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहमदाबाद विमान अपघात प्रकरणात महत्वाची माहिती, ‘इंधन स्विच लॉक’वर स्पष्टीकरण, FAA ने म्हटले…

Air India crash report: अहमदाबात विमान अपघात प्रकरणाचा प्राथमिक अहवाल आला आहे. त्या अहवालात दिलेल्या कारणांची चौकशी सुरू आहे. या अहवालात बोईंग विमानांच्या इंधन स्विच लॉकवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

अहमदाबाद विमान अपघात प्रकरणात महत्वाची माहिती, 'इंधन स्विच लॉक'वर स्पष्टीकरण, FAA ने म्हटले...
| Updated on: Jul 14, 2025 | 8:54 AM
Share

Air India crash report:  गुजरातमधील अहमदाबाद येथे १२ जून रोजी झालेल्या विमान अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल आला आहे. या अहवालात विमान अपघाताच्या घटनेबाबत दोन कारणांचा उल्लेख केला आहे. परंतु हा प्राथमिक अहवाल असल्याने त्या कारणांची चौकशी सुरू आहे. या अहवालात बोईंग विमानांच्या इंधन स्विच लॉकवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यावर आता अमेरिकेच्या फेडरल एव्हियेशन ॲडमिनिस्ट्रेशनने (एफएए) म्हटले आहे की, बोईंग विमानांचे इंधन स्विच लॉक सुरक्षित आहेत. अहमदाबादमधील विमान अपघाताचा प्रारंभिक अहवाल समोर आल्यानंतर एफएएची ही टिप्पणी आली आहे.

स्विच लॉकिंगमधील दोषाबद्दल…

नागरी विमान वाहतूक अधिकाऱ्यांना पाठवलेल्या अधिसूचनेत एफएएच्या म्हटले आहे की, इंधन नियंत्रण स्विचची रचना, ज्यामध्ये लॉकिंग वैशिष्ट्याचा समावेश आहे, विविध बोईंग विमान मॉडेलमध्ये सारखी आहे. एफएएने २०१८ मध्ये बोईंग ७८७ विमानातील इंधन नियंत्रण स्विच लॉकिंगमधील दोषाबद्दल इशारा दिला होता. तथापि त्याचा विचार करण्यात आला नाही.

एएलपीए इंडियाचे अध्यक्ष सॅम थॉमस यांनी सांगितले की, पायलटला आता सुपरवायझरप्रमाणे तपासणी पथकाचा भाग बनवले पाहिजे. २०१८ मधील रिपोर्टमध्ये इंधन लॉक सिस्टीमच्या सदोषतेबाबत संकेत दिले होते. विमानाने उड्डान घेतल्यानंतर एक पायलट दुसऱ्या पायलटला इंधन स्विच का बंद केले? असा प्रश्न विचारतो. तेव्हा दुसरा पायलट मी इंधन स्विच बंद केले नाही, असे सांगतो. उड्डानंतर इंधन स्विच ‘रन मधून कटऑफ’मध्ये आले, असे तपास पथकाच्या अहवालात म्हटले आहे. परंतु इंधन स्विच बंद कसे झाले? याचा कोणताही उल्लेख त्या अहवालात नाही.

अमेरिकन तज्ज्ञ काय म्हणतात?

शनिवारी दोन अमेरिकन सुरक्षा तज्ज्ञांनी सांगितले की, तपासात निरीक्षक होण्याच्या एएलपीए इंडियाच्या विनंती मान्य करत नाही. परंतु तपास अहवालात पायलटच्या चुकीबद्दल कोणताही पक्षपात दिसून येत नाही. एएलपीएचे अमेरिकन प्रतिनिधी जॉन कॉक्स यांनी तपास अहवाल वस्तुनिष्ठ आणि निष्पक्ष असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.