Fact Check : येत्या 1 मार्चपासून कोरोनाच्या लसीसाठी खरंच 500 रुपये मोजावे लागतील?

देशभरात कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा पार पडला. आता लसीकरणाचा दुसरा टप्पा येत्या 1 मार्चपासून सुरु होणार आहे (second phase of vaccination).

Fact Check : येत्या 1 मार्चपासून कोरोनाच्या लसीसाठी खरंच 500 रुपये मोजावे लागतील?
कोरोना लसीकरण प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Feb 27, 2021 | 5:30 PM

मुंबई : देशभरात कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा पार पडला. आता लसीकरणाचा दुसरा टप्पा येत्या 1 मार्चपासून सुरु होणार आहे. मात्र, सध्या कोरोना लसीच्या लसीकरणाबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारची माहिती व्हायरल होत आहे. या माहितीत कितपत सत्य आहे? याबाबत पीआयबीने आर्थात केंद्र सरकारच्या अधिकृत ट्वविटर अकाउंटवर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे (second phase of vaccination).

व्हायरल होत असलेल्या माहितीत नेमकं काय म्हटलंय?

कोरोना लसीच्या दुसऱ्या टप्प्याबाबत व्हाट्सअॅपवर एक मेसेज व्हायरल होत आहे. कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात लसीसाठी 500 रुपये मोजावे लागतील. याशिवाय 60 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना आपल्यासोबत वोटर आयडी, पॅनकार्ड आणावं लागले. हा दावा पीआयबीने फेटाळला आहे. संबंधित दावा पूर्णपणे खोटा आहे, असं स्पष्टीकरण पीआयबीने दिलं आहे.

नेमकं खरं काय?

येत्या 1 मार्च पासून देशभरात कोरोना लसीच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. या टप्प्यात 60 वर्षापेक्षा जास्त वयोगटाच्या नागरिकांना लस दिली जाणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारकडून अधिकृतपणे देण्यात आली आहे. याशिवाय ज्या व्यक्तींना वेगवेगळे प्रकारचे आजार आहेत, ज्यामुळे त्यांना लवकर कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे, अशा 45 वयापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना लस दिली जाणार आहे.

कोणत्या आजाराच्या व्यक्तींना लस दिली जाणार

विशेष म्हणजे कोणत्या आजाराच्या व्यक्तींना लस दिली जाईल, याबाबत अद्याप सरकारने माहिती जारी केलेली नाही. तरीदेखील मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, फुफ्फुसांचा किंवा हृदयाचा आजार असलेल्या रुग्णांना कोरोनाची लस दिली जाऊ शकते, असा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. लसीकरणावेळी रुग्णांना कोणता आजार आहे का, याचं सर्टिफिकेट दाखवणं बंधनकारक असेल.

‘हे’ कागदपत्रे लागतील

कोरोना लसीसाठी आधार नंबर, ड्रायव्हिंग लायसन्स, हेल्थ इन्शूरन्स स्मार्ट कार्ड, मनरेगा ज़ब कार्ड, वोटर आयडी, पॅन कार्ड, बँक/पोस्ट ऑफिस पासबुक, पासपोर्ट, पेन्शन डॉक्युमेंट, MP/MLA/MLA चं आयडी कार्ड, सरकारी कर्मचारी असल्यास सर्व्हिस आयडी कार्ड, नॅशनल पोप्युलेशन रजिस्टर अंतर्गत स्मार्ट कार्ड यापैकी कोणतीही माहिती तुम्ही दाखवू शकता.

दुसरा डोज 28 दिवसांनी

ज्या लोकांना पहिल्यांदा लसीचा डोज मिळेल ते लोक मोबाईल अॅपद्वारे QR आधारित सर्टिफिकेट डाऊनलोड करु शकतील. पहिल्या डोजनंतर 28 दिवसांनी दुसरा डोज दिला जाईल (second phase of vaccination).

खासगी रुग्णालयांमध्ये अडीचशे रुपयात कोरोना लसीचा डोज मिळणार

देशात 16 जानेवारी 2021 पासून कोरोना लसीच्या लसीकरणाचा पहिला टप्पा सुरु झाला होता. पहिल्या टप्प्यात फक्त डॉक्टर, पोलीस, नर्सेस अशा फ्रंटलाईन वर्कर्सला कोरोनाची लस दिली गेली. त्यानंतर आता येत्या 1 मार्चपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये खासगी रुग्णालयांमध्ये 250 रुपयांमध्ये कोरोना लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या 250 रुपयांमध्ये 100 रुपये सर्व्हिस चार्जेसचे आहेत. एक डोज अडीचशेला असेल, असं सूत्रांनी सांगितलं आहे. केंद्र सरकार लवकरच याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Video Fact Check: वनमंत्री संजय राठोड यांचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कधीचा?

Non Stop LIVE Update
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.