बँकेत नोकरी करून वडिलांनी 4 मुलांना शिकवले, सर्व भावंडे UPSC उत्तीर्ण होऊन झाले IAS-IPS

एका कुटुंबातील चार सदस्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली असून हे सर्वजण आयएएस आणि आयपीएस पदांवर कार्यरत आहेत.

बँकेत नोकरी करून वडिलांनी 4 मुलांना शिकवले, सर्व भावंडे UPSC उत्तीर्ण होऊन झाले IAS-IPS
Four Siblings Crack UPSCImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 24, 2022 | 2:20 PM

लालगंज, UPSC ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो जण या परीक्षेत आपले नशीब आजमावतात. पण संधी मात्र काहींनाच मिळते. भारतात UPSC परीक्षा उत्तीर्ण होणे ही मोठी गोष्ट मानली जाते. समाजात त्यांना प्रचंड मान-सन्मान असताे. एकाच कुटुंबातील चार भाऊ-बहीण एकत्र या कठीण परीक्षेत (Four Siblings Crack UPSC) उत्तीर्ण झाले.  उत्तर प्रदेशातील लालगंज जिल्ह्यातील ही घटना आहे. येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील चार सदस्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली असून हे सर्वजण आयएएस आणि आयपीएस पदांवर कार्यरत आहेत.

हे चौघे भावंड असून त्यात दोन भाऊ आणि दोन बहिणींचा समावेश आहे. त्यांचे वडील  बँक कर्मचारी आहेत. अनिल प्रकाश मिश्रा यांनी आपल्या मुलांच्या या यशाबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक असूनही त्यांनी मुलांच्या शिक्षणाबाबत कधीही तडजोड केली नाही. आपल्या मुलांना चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात अशी त्यांची नेहमीच इच्छा होती. अशा परिस्थितीत मुलांनीही अभ्यासाकडे लक्ष दिले आणि मेहनतीपासून कधीच मागे हटले नाही.

मोठा भाऊ आहे IAS

चार भावंडांमध्ये सर्वात मोठा योगेश मिश्रा हा आयएएस अधिकारी आहे. त्यांनी आपले प्रारंभिक शिक्षण लालगंज येथे पूर्ण केले आणि नंतर मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकी पूर्ण केली. शिक्षण घेतल्यानंतर योगेशने नोएडामध्ये नोकरी करत नागरी सेवेची तयारी केली. 2013 मध्ये त्याच्या मेहनतीला फळ मिळाले आणि तो UPSC परीक्षा उत्तीर्ण झाला.

हे सुद्धा वाचा

योगेश यांच्यानंतर त्यांची बहीण क्षामा मिश्रा यांनीही त्यांच्यासारखी नागरी सेवा निवडली आणि त्यासाठी परिश्रमपूर्वक तयारी केली. पहिल्या तीन प्रयत्नात ती अपयशी ठरली पण तरीही तिने हिंमत हारली नाही आणि चौथ्या प्रयत्नात ती परीक्षा उत्तीर्ण झाली. आता क्षामा आयपीएस अधिकारी आहे.

वडिलांना आहे सर्वांचा अभिमान

यानंतर दुसरी बहीण माधुरी मिश्रा लालगंज येथील महाविद्यालयातून पदवीधर झाली आहे. त्यानंतर प्रयागराजमधून मास्टर्स केल्यानंतर त्याने 2014 मध्ये UPSC परीक्षा दिली. आता ती झारखंड केडरची आयएएस अधिकारी बनली आहे. चार भावंडांमधील दुसऱ्या भावाने 2015 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि अखिल भारतीय 44 वा क्रमांक मिळवला. आता ते बिहार केडरमध्ये कार्यरत आहेत.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.