लखनऊमध्ये 4 मजली हॉटेलला आग; 40 पैकी 18 जणांना काढले बाहेर; जखमींच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री योगींची रुग्णालयाला भेट

उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथील हॉटेलमध्ये सोमवारी सकाळी भीषण आग लागली. काही लोक हॉटेलच्या खोल्यांमध्ये अडकून पडले होते. हजरतगंज भागातील लिवाना हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. हॉटेलमध्ये थांबलेल्या 40 पैकी 18 लोकांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना जखमींना रुग्णालयात दाखल करण्या आले आहे. तर जखमींपैकी दोघे जण बेशुद्ध पडले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

लखनऊमध्ये 4 मजली हॉटेलला आग; 40 पैकी 18 जणांना काढले बाहेर; जखमींच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री योगींची रुग्णालयाला भेट
Follow us
| Updated on: Sep 05, 2022 | 12:07 PM

नवी दिल्लीः उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील (Lucknow) एका हॉटेलमध्ये भीषण आग लागून दोघांचा मृत्यू (Two Death) झाला असून काही लोकं हॉटेलमध्येच अडकली आहेत. ही घटना हजरतगंज भागात घडली असून आग लागलेल्या हॉटेलचे नाव लेवाना हॉटेल (Levana Hotel) आहे. हॉटेलला आग लागल्यानंतर हॉटेलच्या खोल्यांमधून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू करण्यात आले आहेत. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 3 घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशमन दलाने आता 40 लोकांपैकी 18 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. हॉटेलमध्ये 30 खोल्या होत्या, त्यामध्ये सुमारे 35-40 लोकं अडकल्याची शंका व्यक्त केली गेली होती. त्यापैकी 18 लोकांना बाहेर काढण्यात आले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आगीत जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रुग्णालयाला भेट दिली आहे.

हॉटेलमधील 18 जणांना बाहेर काढले

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती. त्यानंतर हॉटेलमधील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये अडकलेल्या 18 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. तर यामध्ये जखमी झालेल्या नागरिकांनाही रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जखमींची भेट घेतली आहे. हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर अडकलेल्या लोकांनाही बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

तिसऱ्या मजल्याला आग

हॉटेलला लागली ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हे हॉटेल चार मजली असून आग लागल्यानंतर जिन्यावरुन नागरिकांनी बाहेर आल्याने त्यांचे जीव वाचले आहेत. आगीने रौद्ररुप धारण केल्यानंतर मात्र तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या लोकांना हॉटेलचे छत तोडून अग्निशमन दलाने बाहेर काढले आहे.

आगीत एक कुटुंब अडकले

हॉटेलमध्ये आग लागल्यानंतर कॉरिडॉरमध्येच मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. या हॉटेलमधी खोली क्रमांक 214 मध्ये एक कुटुंब अडकल्याचे सांगण्यात येत असून त्यातील दोघं जण बेशुद्ध पडल्याचेही सांगण्यात येत आहे. सकाळी 6 वाजता हॉटेलमधून धूर बाहेर येत असल्याचे लक्षात येताच आग लागल्याचे स्पष्ट झाले. हॉटेलमधील 30 खोल्यांपैकी 18 खोल्या बुक करण्यात आल्या होत्या, त्यामुळे आता प्रत्येक खोलीचे दार तोडून तपासणी करण्याचे काम सुरु आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.