AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाच्या मांडवात वरातीचे जेवण सुरु असताना अंदाधुंद गोळीबार, अमेरिकेतून गँगस्टरने घडवला हल्ला

Crime News: हिमांशू भाऊ टोळीची गुन्हेगारी कुंडली बरीच जुनी आहे. हिमांशू याने प्रथम गोहाना येथील मिठाई व्यवसायी मातुराम यांच्या दुकानावर गोळीबार करून कोट्यवधी रुपयांची खंडणी घेतली होती. भाऊ गँग प्रसिद्धीच्या झोतात आलेली ही पहिलीच घटना होती.

लग्नाच्या मांडवात वरातीचे जेवण सुरु असताना अंदाधुंद गोळीबार, अमेरिकेतून गँगस्टरने घडवला हल्ला
लग्न मांडवात हत्या
| Updated on: Dec 07, 2024 | 8:52 AM
Share

लग्न समारंभाचा आनंद सुरु होता. वारती जेवणाचा स्वाद घेत होते. परंतु अचानक दोन युवक लग्न मांडवात आले. त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. या गोळीबारात लग्न मांडवातच एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. हरियाणामधील रोहतकमध्ये झालेल्या या घटनेमुळे आनंदाचा प्रसंग क्षणात दु:खात गेला. मृत्यू झालेल्या युवकाचे नाव मंजीत अहलावत आहे. गँगवारचा वादामुळे हा गोळीबार झाल्याचा सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात अमेरिकामध्ये असलेल्या गँगस्टर हिमांशू याचा हात असल्याचे बोलले जात आहे.

जेवण करत असताना हल्ला

रोहतक जिल्ह्यातील किलोई गावात लग्न समारंभ सुरु होता. लग्नाची वरात झज्जर जिल्ह्यातील दिगल गावातून आली होती. लग्नाची मिरवणूक भूमी गार्डनमध्ये पोहोचली होती आणि सर्वजण लग्नाच्या आनंदात सहभागी झाले होते. तेव्हा अचानक काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये काही युवक आले. मनजीत आणि मनदीप एका टेबलवर जेवत असताना, हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. सुमारे आठ ते दहा राउंड त्यांनी फायर केले. मनजीतच्या डोक्यात गोळी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत बसलेल्या मनदीपच्या पायाला गोळी लागली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मनजीतच्या हत्येमागे हिमांशू भाऊ टोळीचा हात असल्याचा दावा केला जात आहे. अमेरिकेत राहणारा गँगस्टर हिमांशू भाऊने दिल्लीतही अनेक गुन्हे केले आहेत. मनजीत अहलावत हे दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबल होते. सध्या ते फायनान्समध्ये काम करतात.

कोण आहे हिमांश भाऊ

हिमांशू भाऊ टोळीची गुन्हेगारी कुंडली बरीच जुनी आहे. हिमांशू याने प्रथम गोहाना येथील मिठाई व्यवसायी मातुराम यांच्या दुकानावर गोळीबार करून कोट्यवधी रुपयांची खंडणी घेतली होती. भाऊ गँग प्रसिद्धीच्या झोतात आलेली ही पहिलीच घटना होती. तेव्हापासून भाऊ टोळी अनेक गंभीर गुन्हे करण्यासाठी कुप्रसिद्ध झाली आहे. हिमांशू आता अमेरिकेत बसून हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानसह अनेक गुन्हेगारी टोळी चालवतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो तरुणांना गँगमध्ये भरती करतो.

BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.