AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! टॅरिफनंतर अमेरिकेतून भारतासाठी पहिल्यांदाच गुडन्यूज, घडामोडींना वेग

अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफनंतर भारत आणि अमेरिकेच्या संंबंधांमध्ये कटुता निर्माण झाली आहे, मात्र त्यानंतर आता पहिल्यांदाच एक मोठी गुडन्यूज समोर आली आहे.

मोठी बातमी! टॅरिफनंतर अमेरिकेतून भारतासाठी पहिल्यांदाच गुडन्यूज, घडामोडींना वेग
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 13, 2025 | 5:37 PM
Share

अमेरिकेनं भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला आहे, भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून आपण भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर भारत रशियाकडून जी तेलाची आयात करतो ते पैसे रशिया फंड म्हणून युक्रेनविरोधातील युद्धात वापरत असल्याचा आरोप देखील ट्रम्प यांनी केला आहे, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेमधील संबंधांमध्ये कटूता निर्माण झाली आहे. मात्र आता एक गुड न्यूज समोर आली आहे.

ती म्हणजे गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेमध्ये एका मोठ्या डील संदर्भात बोलणी सुरू आहेत, आता लवकरच ही अडकलेली डील पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. अमेरिकेचं शिष्टमंडळ भारताच्या दौऱ्यावर आलं होतं, आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे, ती म्हणजे आता या डील संदर्भात चर्चा करण्यासाठी भारताचं शिष्टमंडळ या आठवड्यात अमेरिकेला जाणार आहे, गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधला होता.

गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर त्यांनी याबाबत माहिती देताना म्हटलं होत की, दोन्ही देशांमध्ये व्यापारी डील संदर्भात सुरू असलेली चर्चा सकारात्मक पद्धतीनं पुढे जात आहे. बिजनेस टुडेच्या एका रिपोर्टनुसार आता भारताचं एक वरिष्ठ शिष्ठमंडळ या आठवड्यात अमेरिकेला जाणार आहे. दोन्ही देशांमध्ये डील संदर्भात बोलणी होणार आहेत, अमेरिकेनं 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर या डील संदर्भातील चर्चेला ब्रेक लागला होता, मात्र त्यानंतर अमेरिकेचं शिष्टमंडळ भारतात आल्यानं पुन्हा एकदा या डील संदर्भात चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता टॅरिफच्या निर्णयावर देखील काही सकारात्मक विचार होण्याचे संकेत मिळत आहेत. भारत आणि अमेरिकेमध्ये होणाऱ्या या व्यापारी डीलचा मुख्य उद्देश हा 2030 पर्यंत दोन्ही देशामधील व्यापार दुप्पट करणे हा आहे, सध्या अमेरिका आणि भारतामध्ये 191 अब्ज डॉलरचा व्यापार होत आहे, तो 2030 पर्यंत 500 अब्ज डॉलरपर्यंत पोहचवण्याचं उद्दिष्ट आहे.

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.