रामदेवबाबांविरोधात डॉक्टरांचं 1 जून रोजी काळ्या फिती लावून आंदोलन, डीपीही ब्लॅक ठेवणार

रामदेवबाबांविरोधात डॉक्टरांचं 1 जून रोजी काळ्या फिती लावून आंदोलन, डीपीही ब्लॅक ठेवणार
योगगुरु रामदेव बाबा

योग गुरू रामदेवबाबा यांनी अॅलिओपॅथीबाबत केलेल्या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद काही थांबताना दिसत नाही. (FORDA to hold nationwide protest on June 1 against Baba Ramdev's remarks)

भीमराव गवळी

|

May 31, 2021 | 10:10 AM

नवी दिल्ली: योग गुरू रामदेवबाबा यांनी अॅलिओपॅथीबाबत केलेल्या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद काही थांबताना दिसत नाही. इंडियन मेडिकल असोसिएशननंतर फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने रामदेवबाबांना नोटीस बजावली आहे. आता फेडरेशन ऑफ रेजिडेंट डॉक्टर्स असोसिएशन इंडिया (फोर्डा)ने उद्या मंगळवारी 1 जून रोजी देशभर काळा दिवस पाळणार असल्याचं जाहीर केलं आहे. (FORDA to hold nationwide protest on June 1 against Baba Ramdev’s remarks)

देशातील रेजिडेंट डॉक्टर्स असोसिएशनचे सर्व डॉक्टर उद्या 1 जून रोजी काळा दिवस पाळणार आहेत. उद्या सर्व डॉक्टर रामदेवबाबांचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून काम करणार आहेत. तसेच व्हॉट्सअॅपवरील डीपीही ब्लॅक ठेवणार आहेत, असं फोर्डाचे अध्यक्ष डॉ. मनिष यांनी सांगितलं. उद्या कोरोना ड्युटीवर असेलेले सर्व डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ पीपीई किटवर काळी पट्टी लावून काम करतील. तसेच व्हॉट्सअॅप डीपीही ब्लॅक ठेवतील, असंही ते म्हणाले.

एफआयआर दाखल

दरम्यान, आयएमएचे बंगाल शाखेचे माजी अध्यक्ष आणि टीएमसीचे खासदार डॉ. शांतनू सेन यांनी रामदेवबाबांवर एफआयआर दाखल केला आहे. रामदेव बाबा यांच्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. आधुनिक औषधांनी कोरोना पीडितांचा मृत्यू होतोय असं रामदेव बाबांनी म्हटलं आहे. कोरोना व्हॅक्सीन घेतल्यानंतरही दहा हजार डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचं रामदेव बाबांनी म्हटलं आहे. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हा गंभीर गुन्हा आहे. रामदेव बाबा आधुनिक उपचार पद्धतीची बदनामी करत आहेत. एकीकडे डॉक्टर जीव मुठीत घेऊन रुग्णांना वाचवत आहेत. देशाची सेवा करणाऱ्या या डॉक्टरांचा सन्मान केला पाहिजे. मात्र रामदेव बाबा त्यांना बदनाम करत असल्यानेच गुन्हा दाखल केला आहे, असं सेन यांनी सांगितलं.

काय होतं वक्तव्य?

यापूर्वी रामदेवबाबाने व्हॉटसअॅपवर एक मेसेज करून अॅलोपॅथीवर टीका केली होती. आश्चर्यकारक तमाशा आहे. अॅलोपॅथी मूर्खपणाचं आणि दिवाळखोर विज्ञान आहे. आधी रेमडेसिवीर फेल ठरलं, नंतर अँटिबायोटिक्स फेल झालं, नंतर स्टेरॉईड फेल झाले, प्लाझ्मा थेरपीवरही बंदी घालण्यात आली, असं ते म्हणाले होते. तापावर दिलं जाणारं फॅबीफ्ल्यू देखील निकामी ठरलंय. जेवढे औषधं देत आहेत त्या सर्वांचं हेच होत आहे. त्यामुळे हा काय तमाशा सुरू आहे, असं जनता म्हणत आहे. त्यांची तापावरील कोणतीही औषधं काम करत नाहीये. कारण ते शरीराचं तापमान कमी करत आहेत. मात्र, ज्या विषाणूमुळे, बुरशीमुळे ताप येत आहे त्याचा यांच्याकडे इलाज नाही. तर मग हे कसे बरे करणार?, असा सवालही त्यांनी केला होता. (FORDA to hold nationwide protest on June 1 against Baba Ramdev’s remarks)

संबंधित बातम्या:

Ramdev Vs IMA: रामदेव म्हणतात, IMA अधिकाऱ्यांचे संबंध धर्मपरिवर्तन करणाऱ्यांशी !

रामदेव बाबांकडून अखेर ‘ते’ वक्तव्य मागे, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस!

रामदेव बाबांचा पुन्हा एकदा एलोपॅथीवर निशाणा, IMA आणि फार्मा कंपन्यांना योगगुरुंचे 25 प्रश्न

(FORDA to hold nationwide protest on June 1 against Baba Ramdev’s remarks)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें