AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशाच्या राजकारणात नव्या राजकीय पक्षाची एन्ट्री; थेट मोदींच्या विरोधात CBIचा माजी अधिकारी मैदानात उतरला

देशाच्या राजकारणात नव्या राजकीय पक्षाची एन्ट्री झाली आहे. थेट मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून CBIचा माजी अधिकारी मैदानात उतरला आहे.

देशाच्या राजकारणात नव्या राजकीय पक्षाची एन्ट्री; थेट मोदींच्या विरोधात CBIचा माजी अधिकारी मैदानात उतरला
varanasi newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 04, 2026 | 7:49 AM
Share

सीबीआयचे माजी संचालक एम. नागेश्वर राव यांनी राजकारणात एन्ट्री केली आहे. त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही. तर स्वत: नवीन पक्षाची घोषणा केली आहे. एम. नागेश्वर राव हे सार्वजनिक सतनात पार्टीचे अध्यक्ष असणार आहेत. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या संसदीय मतदरासंघ वाराणसीतून पक्षाची घोषणा केली आहे. भारतात सुधारणा केवळ प्रशासनात आणून चालणार नाहीत, तर इतर क्षेत्रातही सुधारणांची गरज असल्याचे विचार मनात ठेवून पक्ष काढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नागेश्वर राव म्हणाले, ‘एसएसपीची सनातनची संकल्पना ही केवळ उपासना पद्धतीपुरती मर्यादित नाही. सनातन ही संकल्पना सत्य, धर्म, कर्तव्य, करुणा, न्याय, कुटुंब, समाज, लोककल्याण इत्यादीवर आधारित जीवनशैली आहे. सार्वजनिक सनातन पक्ष हा शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सांस्कृतिक संबंध या चार स्तंभावर आधारलेला आहे. नागेश्वर राव पुढे म्हणाले, ‘पक्षाचे ध्येय सांस्कृतिक वारशाला जोडून आधुनिक भारताची उभारणी करणे आहे. तांत्रिक, आर्थिक विकासासहित आधुनिक भारताला सांस्कृतिक ओळखीशी जोडणे आहे’. राव यांनी पुढे सांगितलं की, आमच्या पक्षाची भूमिका ही कोणत्याही विशिष्ट जाती आणि किंवा समुदायाच्या विरोधात नसणार. सनातन विचारधारा कोणाच्याही विरोधात नाही. पक्षाला सामाजिक फूट पाडण्याऐवजी सर्वांसाठी काम करायचे आहे’. राव यांनी वाराणसीमधून राजकारणाला सुरुवात केली आहे. ‘नव्या पक्षाच्या माध्यमातून आधुनिकता आणि संस्कृतीचं संतुलन साधण्याचं ध्येय असणार आहे.

राव पुढे म्हणाले की, सनातनला केवळ निवडणूक चिन्ह मानले जाऊ नये. पक्षाच्या धोरणातून मूल्ये शिक्षण, आरोग्य, रोजगार, प्रशासनात सुधारणा करण्याचा मानस आहे. त्याचबरोबर मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे केवळ धार्मिक स्थळे म्हणून नव्हे, तर जतन करण्याच्या गरजेवर भर दिलाय. ही स्थळे लोकसहभागाद्वारे संवर्धन केले पाहिजे.  आमचा सनातन कोणाच्याही विरोधात नाही. कोणत्याही जाती किंवा समुदायाला विरोध करण्याचा आमचा कोणताही विरोध नाही. आम्हाला समाजात फूट पाडण्याऐवजी सर्वांसाठी काम करायचे आहे.यावेळी पक्षाचे  राष्ट्रीय उपाध्यक्ष महंत तीर्थानंद, उपाध्यक्ष रितू राठोड, महासचिव राजा सक्षम सिंह योगी, प्रवक्त्या बबिता शर्मा, उत्तर प्रदेशचे प्रभारी राकेश तिवारी आणि संघटन मंत्री नारायण सिंह आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर