AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरीब आहे पण धोकेबाज नाही, माजी मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर पाठिंबा

loksabha Election : लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीसा मोठा झटका लागला आहे. एकीकडे प्रादेशिक पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडत असताना भाजप मात्र अनेक प्रादेशिक्ष पक्षांना सोबत घेण्याच्या तयारीत लागला आहे. एनडीएला ४०० जागा मिळाव्या यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.

गरीब आहे पण धोकेबाज नाही, माजी मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर पाठिंबा
| Updated on: Feb 09, 2024 | 7:24 PM
Share

Loksabha election 2024 : बिहारमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात नव्या घडामोडी घडत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्याने आरजेडी आणि काँग्रेसला राज्यात सत्तेतून बेदखल व्हावे लागले आहे. दुसरीकडे नितीश कुमार गेल्याने इंडिया आघाडीला ही मोठा धक्का बसला आहे. नितीश कुमार भाजपकडे गेल्याने हिंदुस्थानी अवाम मोर्चा (हम) चे संस्थापक जीतन राम मांझी यांना काँग्रेसकडून ऑफर आहे. नव्या सरकारमध्ये त्यांनी दोन मंत्रिपदांची मागणी केली आहे. मांझी यांच्या पक्षाकडे 4 आमदार असले तरी सरकारमध्ये बहुमत मिळवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. मांझी यांच्या पक्षाला एकच मंत्रीपद मिळाले आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी मात्र आज मोठी घोषणा केली आहे.

‘गरीब आहे पण धोकेबाज नाही’

बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींदरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी पंतप्रधान मोदींना जाहीर पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, “माझ्यासाठी सत्तेची कोणतीही खुर्ची महत्त्वाची नाही. गरीब, शोषित आणि दलितांच्या हक्काचा आवाज बुलंद करत राहणे एवढेच त्यांचे कार्य पुरेसे आहे. मी गरीब नक्कीच आहे पण मी धोकेबाज नाही. हम पक्ष विश्वासघात करू शकत नाही. हम मोदीजींच्या सोबत होते, हम मोदीजींच्या सोबत आहे, हम मोदीजींच्या सोबतच राहील. असं त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

आरजेडीकडून होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर

बिहारमध्ये एनडीएचे सरकार येऊ नये म्हणून आरजेडीने देखील प्रयत्न सुरु केले होते. त्यासाठी त्यांनी जीतनराम मांझी यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देखील दिली होती. पण मांझी हे एनडीएसोबतच राहिले. आता त्यांनी मोदींना जाहीर पाठिंबा दिल्याने चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

इंडिया आघाडीला धक्का

लोकसभा निवडणुकीच्या आधी इंडिया आघाडीला झटका लागला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवान मान यांनी ही स्वबळाचा नारा दिला आहे. तर बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार एनडीए सोबत आल्याने तीन राज्यांमध्ये काँग्रेसला मोठा झटका लागला आहे. उत्तर प्रदेश आणि आंध्रप्रदेशमध्ये देखील भाजपकडून जुन्या मित्र्यांना व प्रादेशिक पक्षांना एनडीएमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.