कर्नाटकच्या उडिपी टोल नाक्यावर ॲम्ब्युलन्सचा डेंजर अपघात; थरारक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद

व्हिडिओमध्ये ॲम्ब्युलन्स भरधाव वेगाने येताना दिसत आहे. टोल नाक्यावर एक जनावर बसले होते. या जनावराचा जीव वाचवण्यासाठी  म्ब्युलन्स चालकाने जोरदार ब्रेक मारला. यामुळे भरधाव वेगात असलेल्या या ॲम्ब्युलन्सचे बॅलन्स बिघडले आणि ॲम्ब्युलन्स उलटी होऊन रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. या अपघातात ॲम्बुलन्स बोनट उडाल्याचे व्हिडिओ दिसत आहे.

कर्नाटकच्या उडिपी टोल नाक्यावर ॲम्ब्युलन्सचा डेंजर अपघात; थरारक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद
वनिता कांबळे

|

Jul 20, 2022 | 8:45 PM

उडिपी : कर्नाटक(Karnataka ) मध्ये एका ॲम्ब्युलन्सला(Ambulance) भीषण अपघात झाला आहे. एक टोल नाक्यावर(toll gate) हा अपघात झाला आहे. या अपघाताचा थरार टोल नाक्यावरील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ॲम्बुलन्स टोल कलेक्शन चेक पोस्टला जाऊन धडकल्याचे व्हिडिओत दिसत आहे. ही धडक इतकी भीषण होती की ॲम्बुलन्स रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. भरधाव वेगात असलेल्या या अँम्ब्युलन्सने कर्मचाऱ्यांना उडवले. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. ही ॲम्बुलन्स एका रुग्णाला घेऊन निघाली होती.

कर्नाटकच्या उडपी टोल नाक्यावर ॲम्बुलन्सला हा अपघात झाला आहे. या अपघाताचा सर्व घटनाक्रम टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. टोल नाक्यावर बसलेल्या एका जनावराचा जीव वाचवताना हा पगार झाल्याचे टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

जनावराचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात झाला अपघात

व्हिडिओमध्ये ॲम्ब्युलन्स भरधाव वेगाने येताना दिसत आहे. टोल नाक्यावर एक जनावर बसले होते. या जनावराचा जीव वाचवण्यासाठी  म्ब्युलन्स चालकाने जोरदार ब्रेक मारला. यामुळे भरधाव वेगात असलेल्या या ॲम्ब्युलन्सचे बॅलन्स बिघडले आणि ॲम्ब्युलन्स उलटी होऊन रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. या अपघातात ॲम्बुलन्स बोनट उडाल्याचे व्हिडिओ दिसत आहे.

ॲम्ब्युलन्सने टोल नाक्यावरील तीन ते चार कर्मचाऱ्यांना उडवले

भरधाव वेगाने येणारी ॲम्ब्युलन्स पाहून टोल नाक्यावर एकच गोंधळ उडाला. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी टोल नाक्यावरील बॅरीगेट्स हटवून येथे बसलेल्या जनावाराला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी टोल नाक्यात घुसलेल्या कारने टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना उडवले. यातील एक कर्मचारी धडक लागून खाली पडल्याचे व्हिडिओत दिसत आहे. हा अपघात एवढा डेंजर आहे की सीसीटीव्ही फुटेज पाहताना अंगावर काटा येत आहे. या अपघातात चार जण जखमी झाले असून ॲम्ब्युलन्सचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें