AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Virus Update : देशात पुन्हा कोरोनाच्या चौथ्या लाटेची दस्तक? दिल्लीत वेग वाढला, 24 तासात मृत्यूही वाढले

Coronavirus Fourth Wave : जगाच्या पाठीवर थैमान घालणाऱ्या कोरोनाने (Corona) चीनला आपल्या पंजात धरले आहे. येथील शांघाई शहरात सध्या लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच लोकांना गरज असेल तरच बाहेर पडण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोनाची काळी छाया पुन्हा जगावर पडणार काय असेच प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यादरम्यानच भारतात (India) सगळ सुरळीत सुरू अल्याने तर […]

Corona Virus Update : देशात पुन्हा कोरोनाच्या चौथ्या लाटेची दस्तक? दिल्लीत वेग वाढला, 24 तासात मृत्यूही वाढले
भारतात 2,380 कोरोना रूग्णांची नोंदImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 18, 2022 | 12:48 PM
Share

Coronavirus Fourth Wave : जगाच्या पाठीवर थैमान घालणाऱ्या कोरोनाने (Corona) चीनला आपल्या पंजात धरले आहे. येथील शांघाई शहरात सध्या लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच लोकांना गरज असेल तरच बाहेर पडण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोनाची काळी छाया पुन्हा जगावर पडणार काय असेच प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यादरम्यानच भारतात (India) सगळ सुरळीत सुरू अल्याने तर कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने कोरोनाचे सगळे नियम शिथिल करण्यात आले होते. दोन वर्षानंतर देशातील जनजीवन हे पुर्वपदावर येत होते. त्यानंतर आता मात्र पुन्हा चिंतेचे वारे देशावर वाहताना दिसत आहेत. देशात पुन्हा कोरोनाचे रूग्ण (Corona patient) वाढताना दिसत आहेत. गेल्या 24 तासांत, भारतात कोरोनाचे 2,183 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 214 रुग्णांचा मृत्यू झाला. एक दिवस आधी म्हणजेच शनिवारी 1,150 प्रकरणे नोंदवली गेली आणि 4 जनांचा मृत्यू झाला. सर्वात भयावह आकडेवारी दिल्ली-एनसीआरमधून समोर येत आहे. आकडेवारीनुसार, दिल्ली-नोएडामध्ये देशातील प्रत्येक चौथा कोरोनाचा रुग्ण समोर येत आहे.

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आता कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. संसर्गाचे प्रमाणही वाढत आहे. 24 तासांत देशात 2.61 लाख चाचण्या घेण्यात आल्या, त्यापैकी 2,183 लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. संसर्गाचे प्रमाण 0.83% पर्यंत वाढले. एका दिवसापूर्वी ते 0.31% होते. दिवसेंदिवस नवीन प्रकरणांमध्येही वाढ होत आहे. 4 ते 11 एप्रिल दरम्यान देशात 7,348 संक्रमित आढळले, ज्यांची संख्या 11 ते 17 एप्रिलपर्यंत 8,348 झाली. म्हणजेच एका आठवड्यात कोरोनाचे रुग्ण 10 टक्क्यांनी वाढले आहेत.

दिल्ली-एनसीआरमध्ये वेगाची भीती

एकट्या राजधानी दिल्लीत कोरोनाचे 517 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी नोएडामध्ये 65 नवीन प्रकरणे समोर आली असून त्यापैकी 19 विद्यार्थी आहेत. दिल्ली-नोएडामध्ये 582 नवीन संक्रमित आढळले आहेत. म्हणजेच देशातील प्रत्येक चौथा संक्रमित फक्त दिल्ली-नोएडामध्ये आढळून येत आहे. मात्र, दोन्ही ठिकाणी एकाचाही मृत्यू झाला नाही ही दिलासादायक बाब आहे. दिल्ली-नोएडा व्यतिरिक्त एनसीआरच्या इतर भागातही कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. दिल्लीनंतर गुरुग्राममध्ये सर्वाधिक 157 रुग्ण आढळले आहेत. रविवारी, फरिदाबादमध्ये 32 आणि गाझियाबादमध्ये 27 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. गाझियाबाद आणि नोएडामध्येही मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होत आहे. प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने एनसीआरमधील सर्व जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

यूपी-पंजाब-हरियाणातही भीतीदायक वातावरण

उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणामधून बाहेर पडणाऱ्या कोरोनाची आकडेवारीही भीतीदायक आहे. अवघ्या तीन दिवसांत येथे नवीन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. 14 एप्रिल रोजी यूपीमध्ये कोरोनाचे 90 रुग्ण आढळले. तर रविवारी 135 रुग्ण आढळले. पंजाबमध्ये 14 एप्रिल रोजी केवळ 11 प्रकरणे नोंदवली गेली आणि 17 एप्रिल रोजी 8 संक्रमित आढळले. त्याचप्रमाणे 14 एप्रिल रोजी हरियाणात 170 रुग्ण आढळले, तर रविवारी 191 रुग्ण आढळले.

काळजी करण्यासारखे काय आहे?

नक्कीच देशात पुन्हा एकदा कोरोनाचा वेग वाढला आहे. आताही निष्काळजीपणा सुरू राहिला तर चौथी लाट येऊ शकते. राजधानी दिल्लीत संसर्गाचे प्रमाण वाढल्यानंतर डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. मास्क पुन्हा अनिवार्य केले जावेत, असे डॉक्टरांचे मत आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे. दिल्लीच्या सरकारी रुग्णालयातील आपत्कालीन विभागाच्या प्रमुख डॉ. रितू सक्सेना यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, आता मोठे मेळावे टाळले पाहिजेत. तसेच, आता लोकांनी मास्क घालावे आणि सर्व कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करावे. अपोलो रुग्णालयाचे डॉक्टर सुरंजित चॅटर्जी म्हणाले की रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्या अजूनही खूपच कमी आहे आणि संसर्ग झालेल्यांमध्ये लक्षणे देखील सौम्य आहेत, परंतु आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. त्यांनी मास्क पुन्हा अनिवार्य करण्याची मागणीही केली आहे.

महाराष्ट्रातही रुग्णांची संख्येत वाढ

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे सर्व नियम हटविण्यात आले होते. मात्र देशात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येने राज्याची चिंता वाढवली आहे. त्यातच राज्यासाठीही खतऱ्याची घंटा वाजली आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाने पाय पसरले आहेत. रविवारी 127 नवीन संसर्गाची नोंद झाली. तर शनिवारी नवीन रुग्णांची संख्या 98 होती. महाराष्ट्रातही कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात कोरोनामुळे आतापर्यंत ४४ मृत्यू जनांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईचे 3 आहेत.

इतर बातम्या :

Amravati मधील राड्यानंतर अचलपूर, परतवाडा शहरात संचारबंदी

Nitesh Rane on Mumbai Police Commissioner: रझा अकादमीला पोलीस आयुक्तांना हजर राहायला सांगणं हा सरकारी आदेश नाही ना?; नितेश राणे यांचा सवाल

Stock market updates : शेअर बाजारात पडझड, सेंसेक्स 1,100 अकांनी कोसळला, गुंतवणूकदारांना मोठा फटका

कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....