AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तरुणांच्या देशात वृद्धांचे हाल, ज्येष्ठांना एसटीकडून 100 टक्के सवलत, पण रेल्वेने का काढून घेतली 50 टक्के सवलत

कोरोनाकाळात रेल्वेची ज्येष्ठ नागरिकांची प्रवास सवलत अचानक बंद करण्यात आली. कोरोनाची  साथ गेल्यावर रेल्वेच्या इतर सर्व सेवा सुरळीत सुरु झाल्या परंतू ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीवर आलेले गंडांतर काही संपलेले नाही.

तरुणांच्या देशात वृद्धांचे हाल, ज्येष्ठांना एसटीकडून 100 टक्के सवलत, पण रेल्वेने का काढून घेतली 50 टक्के सवलत
senior citizenImage Credit source: socialmedia
| Updated on: Jul 30, 2023 | 8:49 PM
Share

मुंबई | 29 जुलै 2023 : एकीकडे राज्य आणि केंद्रात डबल इंजिन सरकार म्हणून सरकारचे धुरिण नागरिकांना सेवासुविधा वाढत असल्याचे नारे देत आहेत. वेगाने विकास होत असल्याचे ढोल बडवले जात आहेत. एकीकडे महाराष्ट्रात एसटी बसेसमध्ये ज्येष्ठ नागरीकांना मोफत प्रवासाची सुविधा तर दुसऱ्या बाजूला रेल्वेत कोरोनाकाळात बंद केलेली सिनियर सिटीझन सवलत अजूनही सुरु करण्याचे नाव केंद्र सरकार काही केल्या घेत नसल्याने रेल्वेने प्रवास करणारे लाखो ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले आहेत.

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे शिवसेना गट आणि भाजप आणि आता अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट असे तिहेरी इंजिन सरकार आले आहे. परंतू राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचा रेल्वे प्रवास काही सुखकर होण्याचे नाव नाही. कोरोनाकाळात रेल्वेवर निर्बंध आल्यानंतर बंद केलेली ज्येष्ठ नागरिकांची तिकीट सवलत अजूनही सुरु करण्यात आलेली नाही.  रेल्वेमधून कोट्यवधी ज्येष्ठ नागरिक रोज रेल्वेने प्रवास करतात.

केंद्रीय संसदीय समितीचे आवाहन

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत मार्च महिन्यात यावर उत्तर देताना स्पष्ट केले होते की साल 2019-2020 मध्ये भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या तिकीटावर 59,837 कोटी रुपयांची सबसिडी दिली होती. सबसिडीद्वारे प्रत्येक प्रवासी व्यक्तीला सरासरी 53 टक्के सवलत देण्यात येत असते. संसदीय समितीने ज्येष्ठ नागरिकांची सवलत पुन्हा बहाल करावी अशी शिफारस केली होती. स्थायी समितीने ज्येष्ठ नागरिकांना स्लीपर आणि एसी – 3 मध्ये सवलतीचा आढावा घेऊन ती पुन्हा बहाल करण्याचा सल्ला दिला होता. कोरोनाकाळात रेल्वेने 23 मार्च 2020 पासून सर्व प्रवासी गाड्यांचे संचलन बंद केले होते. केंद्रीय संसदीय समितीच्या आवाहनानंतर रेल्वे मंत्रालयाने ज्येष्ठ नागरिकांच्या सवलत बहालीबाबतचा निर्णय अद्यापही घेतलेला नाही.

सवलत नाकारल्याने 2,242 कोटी मिळाले

1 एप्रिल 2022 ते मार्च 2023 दरम्यान सुमारे 4.6 कोटी पुरुष, 3.3 कोटी महिला आणि 18,000 तृतीय पंथी आदी आठ कोटी ज्येष्ठ नागरिकांना सवलत नाकारल्याने त्यांच्याकडून आकारलेल्या तिकीटातून 5,062 कोटी रुपये मिळाले. यात सवलती पोटीची रक्कम गृहीत धरल्यास एकूण 2,242 कोटी जादा मिळाले असल्याचे रेल्वेने माहीतीच्या अधिकारात म्हटले होते.

अरविंद केजरीवाल यांची मागणी

रेल्वे ज्येष्ठ नागरिकांत 60 वर्षांवरील पुरुषांना तिकीटात 40 टक्के सवलत देते, तर 58 वर्षांवरील महिलांना 50 टक्के सवलत देते. रेल्वेच्या बजेटचा आवाका 45 लाख कोटी आहे. आणि सिनियर सिटीझन कोटात बंद केल्याने जर 1600 कोटी वाचत असतील तर रेल्वेच्या बजेट समोर ही रक्कम शुल्लक असल्याचे सांगत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रेल्वेने मोठे मन दाखवून सिनियर सिटीझन यांची प्रवास सवलत सुरु करावी अशी मागणी केंद्र सरकारला एक एप्रिल रोजी पत्र लिहून केली होती.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल