Har Ghar Tiranga : 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टदरम्यान प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवावा; पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन

पुढील महिन्यात 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस आपल्या घरांवर राष्ट्रध्वज (national flag) फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) यांनी देशातील जनतेला केले आहे.

Har Ghar Tiranga : 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टदरम्यान प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवावा; पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 12:30 PM

नवी दिल्ली : देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने देशभरात केंद्र सरकारच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव हा उपक्रम राबावण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत देशभरात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आता याच पार्श्वभूमीवर पुढील महिन्यात 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस आपल्या घरांवर राष्ट्रध्वज (national flag) फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) यांनी देशातील जनतेला केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत देशभरात येत्या 9 ऑगस्टपासून आठवडाभर ‘हर घर तिरंगा'(Har Ghar Tiranga) ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी होऊन प्रत्येकाने आपल्या घरावर तीन दिवस राष्ट्रध्वज फडकावा आणि ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला बळकटी द्यावी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 22 जुलै 1947 रोजी आपण तिरंग्याचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकार केल्याचे देखील मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधानांचे जनतेला आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आपन ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबवत आहोत. देशातील जनतेला मी आवाहन करतो की, येत्या 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवून या मोहिमेला बळकटी द्यावी. 1947 साली आजच्या दिवशी म्हणजेच 22 जुलै रोजी आपण तिरंग्याचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकार केल्याचंही मोदी यांनी म्हटलं आहे.आम्ही या प्रसंगी त्या सर्व महान स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करतो ज्यांनी देशाला स्वातंत्र्य केले. ज्यांनी भारताच्या ध्वजाचे स्वप्न पाहिले, त्यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. विशेष म्हणजे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी फडकवलेल्या पहिल्या तिरंग्याचा फोटो देखील ट्विट केला आहे.

हे सुद्धा वाचा

उत्तर प्रदेशमध्ये 15 ऑगस्टची सुटी रद्द

दरम्यान यंदा योगी आदित्यनाथ सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.15 ऑगस्टची सुटी रद्द करण्यात आली आहे. यंदा शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये तसेच खासगी कार्यालयांना देखील सुटी नसणार आहे.15 ऑगस्टच्या दिवशी उत्तरप्रदेशात मोठ्याप्रमाणात स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे.तसेच ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा एक भाग म्हणून 15 ऑगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या प्रभातफेरीमध्ये ‘रघुपती राघव राजा राम’ आणि ‘वंदे मातरम’ही गीते गावीत अशा सूचना भाजपाच्या वतीने आपल्या सर्व कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.