Parliament Building Event: पूजेपासून ते पंतप्रधान मोदींच्या भाषणापर्यंत; नूतन संसदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे असे असणार नियोजन

महादेव कांबळे, Tv9 मराठी

|

Updated on: May 25, 2023 | 11:42 PM

केंद्रीय सचिवालय, एक्झिक्युटिव्ह एन्क्लेव्ह, राष्ट्रीय संग्रहालय आदी इमारतींच्या बांधकामाचे काम सुरू आहे. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्घाटनाचा कार्यक्रम दोन सत्रात होणार असून तो कार्यक्रम साडेचार तास चालणार आहे.

Parliament Building Event: पूजेपासून ते पंतप्रधान मोदींच्या भाषणापर्यंत; नूतन संसदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे असे असणार नियोजन
Follow us

नवी दिल्ली : देशाला आता नवी संसद 28 मे रोजी मिळणार आहे. त्या संसदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. संसदेचा उद्घाटन सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी केंद्र सरकारने आता सर्व तयारी पूर्ण केली आहे. या नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम दोन सत्रात होणार आहे. पहिल्या सत्रात सकाळी 7.30 ते 9.30 पर्यंत चालणार आहे. म्हणजे हे पहिले सत्र सुमारे दोन तास चालणार आहे. तर उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा दुसरा टप्पा दुपारी 12 ते 2.30 वाजेपर्यंत म्हणजेच सुमारे अडीच तास चालणार असल्याचे सांगण्यत आले आहे.

नवीन संसद भवनाचे बांधकाम सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचाच एक भाग असल्याचे एका तज्ज्ञांनी बोलून दाखवेल. आतापर्यंत नवीन संसद भवनासह काम पूर्ण झाले आहे.

याशिवाय केंद्रीय सचिवालय, एक्झिक्युटिव्ह एन्क्लेव्ह, राष्ट्रीय संग्रहालय आदी इमारतींच्या बांधकामाचे काम सुरू आहे. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्घाटनाचा कार्यक्रम दोन सत्रात होणार असून तो कार्यक्रम साडेचार तास चालणार आहे.

पहिल्या सत्रातील कार्यक्रम?

सकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत हवन व पूजेचा कार्यक्रम होणार आहे. तर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ पूजेसाठी मंडप उभारण्यात येणार आहे.

या पूजेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती यांच्यासह केंद्र सरकारचे मंत्री उपस्थित राहणार आहेत.

त्या पूजेनंतर सकाळी 8.30 ते 9.00 या वेळेत लोकसभेत सेंगोलची स्थापना केली जाणार आहे.

सकाळी 9 ते 9:30 या वेळेत प्रार्थना सभा होईल. या प्रार्थना सभेत ऋषी-मुनी उपस्थित राहणार आहेत.

सकाळी 10:30 वाजता सावरकरांना पुष्पहार अर्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

यावेळी या कार्यक्रमात अनेक नेते सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पहिल्या सत्राचा कार्यक्रम झाल्यानंतर अडीच तासांचा ब्रेक असणार आहे.

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI