गणेश विसर्जन करताना 13 जण बुडाले; या राज्यात घडल्या दुर्देवी घटना; 4 भावंडं गेली वाहून

महेंद्रगडमध्ये मोठ्या उत्साहात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीनंतर गणेशाची मुर्ती विसर्जनासाठी मुर्ती ज्यावेळी नदीत उतरवण्यात आली. त्यावेळी 9 तरुण पाण्यात उतरले होते, ते सर्वजण पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेले.

गणेश विसर्जन करताना 13 जण बुडाले; या राज्यात घडल्या दुर्देवी घटना; 4 भावंडं गेली वाहून
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 8:56 AM

नवी दिल्लीः महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातून काल गणेश विसर्जन करण्यात आले. श्रींची मिरवणुकीनंतर नदी, कालवे आणि धरणातून सार्वजनिक गणपतींचे विसर्जन (Ganpati Visrajan Mirvanuk) करताना 4 भावंडांसह 7 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हरियाणातील महेंग्रगड जिल्ह्यात कालव्यामध्ये बुडून चार युवकांचा मृत्यू (death by drowning) झाला तर सोनीपत जिल्ह्यात गणेश विसर्जन करत असतानाच यमुना नदीच्या प्रवाहातून दोन युवक वाहून गेल्याचे दुर्देवी घटना घडली आहे. तर उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) उन्नाव व संत कबीर नगरमध्ये 7 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्घेटनेत चार लहान मुलांचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रासह हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील वेगवेगळ्या जिल्ह्यातून गणेश विसर्जन करताना चार बालकांसह 11 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर काही भक्तांना वाचवण्यात यश आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यमुना नदीत युवक बुडाले

हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यातील एका कालव्यात 4 युवक बुडाले असून त्यांचे मृतदेह सापडले आहेत. तर सोनीपत जिल्ह्यात गणेशाचे विसर्जन करताना दोन तरुण यमुना नदी पात्रातून वाहून गेल्याची दुर्देवी घटनाही घडली आहे.

उत्तर प्रदेशात 7 जण बुडाले

तर उत्तर प्रदेशामध्ये सात जणांचा बुडून मृत्यू झाला असून काही जणांना वाचवण्यात यश आले आहे मात्र त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचेही सांगण्यात आले आहे.

पाण्यात उतरले आणि वाहून गेले

महेंद्रगडमध्ये मोठ्या उत्साहात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीनंतर गणेशाची मुर्ती विसर्जनासाठी मुर्ती ज्यावेळी नदीत उतरवण्यात आली. त्यावेळी 9 तरुण पाण्यात उतरले होते, ते सर्वजण पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेले.

एनडीआरएफकडून शोध मोहीम

त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून एनडीआरएफची मदत घेऊन सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले मात्र अन्य दोघांच्या मृतदेहाचा शोध चालूच ठेवण्यात आला आहे.तर जखमी असलेल्यांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे.

मुख्यमंत्री खट्टर यांच्याकडून सात्वंन

या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी ट्विट करत युवकांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले असून राज्य सरकार मृतांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.