AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गॅस सिलिंडर बुकिंगबाबत मोठी अपडेट, आता 5 दिवसांनी…तुमच्या घरी गॅस कधी पोहोचणार?

इराण युद्धामुळे गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. एकदा गॅस बुक केल्यानंतर दुसरा गॅस 25 दिवसांनी बुक करता येणार आहे. असे असतानाच आता केंद्र सरकारने नवी माहिती दिली आहे.

गॅस सिलिंडर बुकिंगबाबत मोठी अपडेट, आता 5 दिवसांनी...तुमच्या घरी गॅस कधी पोहोचणार?
gas booking new rule
| Updated on: Mar 31, 2026 | 6:50 PM
Share

Gas Booking New Rule : इराणच्या युद्धामुळे देशात घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस बुकिंग करूनही तो वेळेवर मिळत नाहीये. दुसरीकडे या युद्धामुळे गॅसची किंमतही वाढली आहे. लोकांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळावे यासाठी सरकारने आतापर्यंत आपल्या धोरणात अनेक बदल केले आहेत. पीएनजी कनेक्शन वाढवण्यावर भर दिला जात आहे. असे असतानाच आता गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमात आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार आता तुम्ही गॅस सिलिंडर बुक केले तरी ते आता आणखी उशिरा मिळणार आहे.

नेमकी काय नवी माहिती समोर आली?

सुजाता शर्मा यांनी सांगितल्यानुसार देशाात गॅस सिलिंडरची कोणतीही कमतरता नाही. फक्त सध्याची स्थिती लक्षात घेता गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर ते उशिरा मिळू शकते. अगोदर गॅस सिलिंडर बुक केल्यावर तो लवकर मिळायचा. आता मात्र सिलिंडर मिळण्यास थोडा उशीर होत आहे. अगोदर दोन ते तीन दिवसांत सिलिंडर मिळायचे. आता चार ते पाच दिवस लागू शकतात. म्हणजेच तुम्हाला आता गॅस सिलिंडर आणखी दोन दिवस उशिराने मिळू शकते. गॅस सिलिंडर हवे असेल तर ओटीपी सिस्टिम अनिवार्य करण्यात आली आहे. ग्राहकांनी ओटीपी फक्त डिलिव्हरी बॉयलाच द्यावा, असे आवाहन ग्राहकांना करण्यात आले आहे.

गॅस बुकिंगमध्ये 60 टक्क्यांची वाढ

सुजाता शर्मा यांच्या मतानुसार देशात गॅस सिलिंडरची कमतरता नाही. लोकांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात बुकिंग केली जात आहे. अलिकडच्या काळात बुकिंगमध्ये साधारण 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळेच पुरवठा साखळीवर परिणाम पडला असून गॅस सिलिंडरच्या डिलिव्हरीत उशीर होत आहे, असे सुजाता शर्मा यांनी सांगितले आहे. दरम्यान, सध्याच्या नियमानुसार तुम्ही एकदा गॅस सिलिंडर बुक केल्यास 25 दिवसांनी नवा गॅस सिलिंडर बुक करू शकता. ग्रामीण भागासाठी ही मर्यादा 45 दिवसांची आहे. लवकरच परिस्थिती पूर्ववत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...