Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जयपूर येथे गॅस गळतीने घबराट, फिलींग प्लांटमधून CO2 ची गळती

राजस्थानची राजधानी जयपूर येथे एक मोठा अपघात घडला आहे. जयपूर येथील विश्वकर्मा परिसरात कार्बन डायऑक्साइड (CO2) वायूची गळती सुरु झाल्याने खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाचे पथकाने मदतकार्य सुरु केले आहे.

जयपूर येथे गॅस गळतीने घबराट, फिलींग प्लांटमधून CO2 ची गळती
Follow us
| Updated on: Dec 31, 2024 | 7:23 PM

राजस्थानची राजधानी जयपूर येथे गॅसगळतीने घबराट उडाली आहे. जयपूरात विश्वकर्मा परिसरातील कार्बन डाइऑक्साइड ( CO2 ) गॅस गळतीने अनेकांनी गुदमरल्याच्या तक्रारी केल्या आहेत. ही गॅस गळती विश्वकर्मा परिसरातील रोड क्रमांक – 18 वर होत आहे. येथील अजमेरा गॅस प्लांटमध्ये CO2 ची गळती होत आहे. या संदर्भात नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर सिव्हील डिफेन्स आणि अम्ब्युलन्सच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या देखील मदतीसाठी दाखल झाल्या आहेत. सर्वत्र धूर पसरल्याचे भयावह दृश्य दिसत आहे. पोलिस अधिकारी देखील घटनास्थळी पोहचले आहेत. नागरिकांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरु झाले आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी प्रकल्पात जाऊन गॅस लिकेज बंद करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

ही दुर्घटना टँकरचा व्हॉल्व तुटल्याने घटल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे प्लांटमधून कार्बन डायऑक्साईड गॅसची गळती झाली आहे. विश्वकर्मा पोलिस ठाण्याने मेन व्हॉल्व बंद करून गॅसची गळती बंद केली आहे. या गॅसगळतीने रस्त्यावर दृश्यमानता घटली आहे. त्यामुळे वाहनांना हळू चालविण्याचे आदेश दिले आहेत.

कार्बन डायऑक्साईड गॅस प्लांटमध्ये उभे असलेल्या टँकरमध्ये सुमारे २० टन गॅस भरली होती. मंगळवारी सायंकाळी 4:00 वाजता टँकरचा व्हॉल्व अचानक तुटला,त्यामुळे गॅस गळती होऊन परिसरात २०० ते ३०० मीटरपर्यंत गॅस पसरला आहे. घटनास्थळावर पोलिस आणि फायर ब्रिगेडच्या टीमने दाखल होत पाण्याचा फवारा केला. आणि प्लांटच्या मुख्य व्हॉल्वला बंद केले.सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही.

हे सुद्धा वाचा

अपघातांची मालिका

काही दिवसांपूर्वी जयपूर येथील अजमेर हायवेवर भांकरोटा जवळ गॅस टँकर दुर्घटनेनंतर लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर संपूर्ण प्रदेशात वाहतूकी संदर्भातील नियम कठोरपणे पाळले जात आहेत. जयपूर-अजमेर हायवेवर झालेल्या दुर्घटनेनंतर काही दिवसांनी जयपूर येथे मिथेन गॅसचा टँकर उलटल्याची घटना घडली होती. आणि आता जयपूरमध्ये गॅस फिलींग प्लांटमधून गळती झाल्याची घटना समोर आली आहे.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.