AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर चर्चेला उधाण, भाजपला लगावला टोला

ज्यावेळी गुलाम नबी आझाद यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्ष मी भाजपमध्ये येणार असल्याचं तीन वर्षांपासून सांगत आहेत. त्याचबरोबर त्यांनी मला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती देखील बनवलं असल्याचं जाहीर केलं होतं.

Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर चर्चेला उधाण, भाजपला लगावला टोला
Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर चर्चेला उधाण, भाजपला लगावला टोलाImage Credit source: Social Media
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Aug 26, 2022 | 3:46 PM
Share

नवी दिल्ली : गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी कॉंग्रेस पक्षाच्या (Congress Party) सगळ्या पदांचा राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या (BJP) आणि अन्य पक्षांच्या नेत्यांकडून वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. त्याचबरोबर भाजप पक्षात सामील होणार असल्याची देखील चर्चा होती. परंतु गुलाम नबी आझाद यांनी या सगळ्या तर्कांना पुर्णविराम दिला आहे. मी पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये येणार आहे. त्याचबरोबर मी माझा स्वत:चा पक्ष तयार करणार आहे असं त्यांनी वक्तव्य केलं आहे. त्यामुळे गुलाम नबी आझाद इतर पक्षात जाण्याची शक्यता कमी झाली आहे. मागच्या तीन वर्षापासून भाजपमध्ये जात असल्याची भाजपाने चर्चा सुरु केली होती. तसेच ते एव्हढ्यावर न राहता त्यांनी थेट मला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती देखील केलं होतं असं गुलाम नवी आझाद यांनी जाहीर केलं आहे.

नव्या पक्षाची स्थापण होणार

सकाळपासून गुलाम नबी आझाद हे नेमकं कोणत्या पार्टीत जाणार अशी चर्चा होती. कारण मागच्या काही महिन्यात ज्यांनी कॉंग्रेस पक्ष सोडला आहे त्यांनी इतर पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे गुलाम नबी आझाद हे भाजपमध्ये जाणार असल्याची मोठी चर्चा होती. पण त्यांनी मी कॉंग्रेस सोडल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये जाणार असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर मी तिथं माझा नवा पक्ष स्थापन करणार आहे. भविष्यात तो पक्ष मी राष्ट्रीय राजकारणात आणणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

भाजपाने चुकीचा प्रचार केला

ज्यावेळी गुलाम नबी आझाद यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्ष मी भाजपमध्ये येणार असल्याचं तीन वर्षांपासून सांगत आहेत. त्याचबरोबर त्यांनी मला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती देखील बनवलं असल्याचं जाहीर केलं होतं. ज्यावेळी त्यांना भाजपच्या नेत्यांचा फोन आला होता का ? असं विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी मला भाजपचे नेते का फोन करतील मी थोडी भाजपमध्ये आहे असं उत्तर दिलं. माझे सगळ्या पक्षांच्या नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. मी आत्तापर्यंत कोणत्याही पक्षावरती टीका केलेली नाही.

Follow Us
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार