AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुली 16 व्या वर्षी आई बनू शकतात, तेच त्यांचं लग्नाचं वय असावं; सपा खासदाराची मुक्ताफळं

समाजवादी पक्षाचे खासदार एसटी हसन यांनी शुक्रवारी महिलांसाठी लग्नाचे कायदेशीर वय 18 वरून 21 वर्षे करण्याच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अकलेचे तारे तोडले आहेत.

मुली 16 व्या वर्षी आई बनू शकतात, तेच त्यांचं लग्नाचं वय असावं; सपा खासदाराची मुक्ताफळं
S T Hasan
| Edited By: | Updated on: Dec 17, 2021 | 10:27 PM
Share

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे खासदार एसटी हसन यांनी शुक्रवारी महिलांसाठी लग्नाचे कायदेशीर वय 18 वरून 21 वर्षे करण्याच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अकलेचे तारे तोडले आहेत. हसन म्हणाले की, “मला वाटतं की, जर मुलगी समजदार असेल तर तिचं लग्न 16 व्या वर्षी केलं तरी त्यात काही गैर नाही.” एसटी हसन यांनी पुढे प्रश्न केला की, “जर मुलगी 18 व्या वर्षी मतदान करू शकते, तर ती लग्न का करू शकत नाही?” (Girls should be married when they attain age of fertility, says Samajwadi Party MP S T Hasan)

वास्तविक केंद्र सरकारने मुलींच्या लग्नाचे वय वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी त्यावर आपापली मतं व्यक्त केली आहेत. काहींनी त्याबाबतचं मत व्यक्त करताना अकलेचे तारे तोडले आहेत, तर काहींची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. सध्या मुलींसाठी लग्नाचे किमान वय 18 वर्षे आहे, जे या प्रस्तावानुसार 21 वर्षे करण्यात येणार आहे. जर कायदा झाला तर भारत अशा काही देशांपैकी एक असेल जिथे महिलांसाठी लग्नाचे वय 21 वर्षे आहे.

समाजवादी पक्षाचे खासदार शफीक उर रहमान यांच्यानंतर आता आणखी एक सपा खासदार एसटी हसन यांनीही केंद्राच्या या प्रस्तावावर आक्षेप नोंदवत वादग्रस्त विधान केले आहे. “मुलींच्या लग्नाचे वय 18 वरून 16-17 करण्यात यावे”, असे एसटी हसन यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, “लग्नाला उशीर झाला तर त्या मुली अश्लील व्हिडीओ (पोर्नोग्राफी) पाहात बसतील, घाणेरडे चित्रपट पाहतील आणि हे सगळं व्यर्थ आहे. त्यामुळे मुली वयात आल्यावर त्यांचं लग्न करायला हवं.”

सपा खासदार एसटी हसन यांनी असेही सांगितले की, “जर लग्न लवकर झाले तर त्या मुलीला लवकर मुलं होऊ शकतात, कारण प्रजननक्षमतेचे (फर्टिलिटी) वय 15 ते 30 वर्षे आहे. अशा स्थितीत लग्नाचे वय वाढवू नये”, असे ते म्हणाले. तत्पूर्वी समाजवादी पक्षाचे खासदार शफीक उर रहमान वर्क यांनी या प्रस्तावाबाबत आक्षेपार्ह विधान केले आणि लग्नाचे वय वाढवल्याने मुली आणखी बिघडतील, असं त्यांनी म्हटलं होतं.

इतर बातम्या

“बलात्कार रोखता येत नाही त्यावेळी आनंद घ्यावा”, काँग्रेस आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य; अध्यक्षही हसत राहिले

KRRameshKumar | ‘असं बोलूच कसं शकता तुम्ही!’ वाचाळवीर काँग्रेस आमदाराला प्रियंका गांधींनी सुनावलं

भाषिक अल्पसंख्याक कार्यालय मुंबईत स्थलांतरीत होणार?, केंद्रीय मंत्री नकवींना शिवसेना खासदार भेटले

(Girls should be married when they attain age of fertility, says Samajwadi Party MP S T Hasan)

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.