GK : भारत चीनला कर्ज देतो का? चीनवर किती कर्ज?
भारत अनेक देशांना कर्ज देतो, मात्र भारत हा चीनला कर्ज देतो का? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? चला तर मग आज आपण याचं उत्तर जाणून घेऊयात.

चीनच्या अर्थव्यवस्थेचा समावेश हा जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये होतो. मात्र आता हळुहळु चीनची खरी अर्थिक परिस्थिती जगासमोर येत आहे. चीन हा बाहेरून जरी शक्तिशाली आणि मोठ्या अर्थव्यवस्थेचा देश दिसत असला तरी मात्र आतून परिस्थिती म्हणावी तेवढी चांगली नाहीये, चीन सध्या प्रचंड आर्थिक दबाव आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. एकीकडे आम्ही जगातील एक मोठी आर्थव्यवस्था आहोत, असं चीन जगाला दाखवत आहे, मात्र दुसरीकडे चीनवर वाढत असलेलं कर्जाचं ओझं हे चीनच्या अर्थव्यवस्थेला तडा देण्याचं काम करत आहे. त्यामुळे आता अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का? की भारत चीनला कर्ज देतो का? आणि दोन्ही राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेमध्ये तुलनात्मकरित्या काय फरक आहे? मग चला तर आपण यातील फरक समजून घेऊयात.
चीनमध्ये निर्माण होणारं गरजेपेक्षा जास्त उत्पन्न हाच आता तेथील अर्थव्यवस्थेसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. चीनच्या बाजारपेठांमध्ये सामान तर खूप आहे, मात्र त्याला ग्राहक मिळत नसल्यानं सातत्यानं सामानांच्या किंमती कमी करण्याची वेळ तेथील सरकारवर आली आहे. ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार चीनमध्ये वस्तूंचा पुरवठा वाढला आहे, मात्र मागणी कमी झाली आहे, त्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेत असंतुलन दिसून येत आहे. दुसरीकडे चीनवर कर्ज देखील झपाट्यानं वाढत आहे. स्टेट अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ फॉरेन एक्सचेंजच्या एका रिपोर्टनुसार चीनच्या सरकारवर देशांतर्गत कर्ज 18.8 ट्रिलियन डॉलरवर पोहोचलं आहे. तर इतर देशांनी दिलेल्या कर्जाचा आकडा हा 2.4 ट्रिलियन डॉलर आसपास आहे. एवढं प्रचंड कर्ज सध्या चीनवर आहे.
भारत चीनला कर्ज देतो का?
भारत चीनला कर्ज देत नाही, कारण विकसनशील आणि अविकसीत देशांना अर्थसाह्य करण्याची भारताची पॉलिसी आहे, त्यामुळे भारत चीनला कर्ज देत नाही, या उलट भारतच वर्ल्ड बँक सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कर्ज घेतो. दुसरीकडे भारत नेपाळ, बांग्लादेश, भूतान सारख्या देशांना आर्थिक मदत करतो, इतरही काही देशांना भारत आर्थिक मदत करतो.
