Goa Oxygen leakage : नाशिकनंतर गोव्यात धक्कादायक घटना, रुग्णालयातील ऑक्सिजन टँकला गळती

गोव्यातील रुग्णालयात ऑक्सिजन टँकला मोठी गळती लागली आहे. परिसरात पांढरा धुर पाहायला मिळतोय. ही गळती रोखण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत.

Goa Oxygen leakage : नाशिकनंतर गोव्यात धक्कादायक घटना, रुग्णालयातील ऑक्सिजन टँकला गळती
साऊथ गोव्यातील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन टँकला गळती
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 5:05 PM

पणजी : गोव्यातील एका जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन टँकला गळती लागली आहे. यापूर्वी नाशिकमधील रुग्णालयात ऑक्सिजन टँकमधून ऑक्सिजन गळती झाल्यानंतर ऑक्सिजन पुरवठ्या अभावी 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच गोव्यातील रुग्णालयात ऑक्सिजन टँकला मोठी गळती लागली आहे. परिसरात पांढरा धुर पाहायला मिळतोय. ही गळती रोखण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. (Oxygen tank leakage in Goa district hospital)

साऊथ गोवामधील जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टँकला गळती लागली. त्यानंतर रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली. ऑक्सिजन टँक गळतीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तोपर्यंत ऑक्सिजनची गळती रोखण्याचे प्रयत्न सुरु होते. यादरम्यान रुग्णालय परिसरात पांढऱ्या धुराचं साम्राज्य पाहायला मिळालं.

नाशिकमध्ये 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात 21 एप्रिल रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला होता. यानंतर काही तास रुग्णालयात गोंधळ पाहायला मिळाला. रुग्णालयात व्हेंटिलेटवर असलेले अनेक रुग्ण हे ऑक्सिजन अभावी तडफडत होते. तर दुसरीकडे ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाकडून अथक प्रयत्न केले जात होते. जवळपास एक दीड तासानंतर ही ऑक्सिजन गळती थांबवण्यात आली. या रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यात 150 लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यातील 24 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय.

‘ठेकेदाराचा हलगर्जीपणा कारणीभूत’

नाशिकमधील दुर्घटनेच्या चौकशीसाठी 7 सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. या चौकशी समितीत ठेकेदारावर ठपका ठेवण्यात आला आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नाशिकच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाली. त्यामुळे 24 लोकांना दुर्देवाने प्राण गमवावा लागला, अशी माहिती चौकशी अहवालातून समोर आली आहे.

नाशिकमधील दुर्घटनेचा चौकशी अहवाल दाखल करण्यासाठी शासनाने 15 दिवसांच्या मुदत दिली होती. पण 15 दिवसांच्या मुदतीपूर्वीच हा अहवाल शासनाकडे दाखल करण्यात आला आहे.  विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

कोरोनावरील उपचारादरम्यान ‘या’ औषधाचा वापर नको, WHO चा डॉक्टरांना महत्वाचा सल्ला

नक्षलवाद्यांना कोरोनाचा विळखा, तब्बल 400 नक्षलींना संसर्ग, दहा जणांचा मृत्यू

Oxygen tank leakage in Goa district hospital

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.