भाजप मंत्र्याला ‘ते’ प्रकरण भोवणार? गोव्याचे नगरविकास मंत्री मिलिंद नाईकांचा राजीनामा

एका महिलेशी संबंधित प्रकरणावरुन करण्यात आलेल्या गंभीर आरोपांमुळे अखेर मिलिंद नाईक यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. त्याचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनीही स्वीकारल्याचं कळतंय. गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मिलिंद नाईक यांच्या नावाचा गौप्यस्फोट केल्यानंतर मिलिंद नाईक यांनी त्तत्काळ मंत्रिपद सोडलंय.

भाजप मंत्र्याला 'ते' प्रकरण भोवणार? गोव्याचे नगरविकास मंत्री मिलिंद नाईकांचा राजीनामा
मिलिंद नाईक, गोवा
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 11:46 PM

मुंबई : गोव्यातील सत्ताधारी भाजप सरकारमधील (BJP Government) नगरविकासमंत्री मिलिंद नाईक (Milind Naik) यांनी राजीनामा दिल्याचं खात्रीलायक वृत्त हाती येतंय. एका महिलेशी संबंधित प्रकरणावरुन करण्यात आलेल्या गंभीर आरोपांमुळे अखेर मिलिंद नाईक यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. त्याचा राजीनामा मुख्यमंत्री प्रमोद सावंत स्वीकारल्याचं कळतंय. गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी मिलिंद नाईक यांच्या नावाचा गौप्यस्फोट केल्यानंतर मिलिंद नाईक यांनी त्तत्काळ मंत्रिपद सोडलंय.

सेक्स स्कँडलमध्ये गोवा मंत्रिमंडळातील मंत्री मिलिंद नाईक असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याकडून उघड करण्यात आलं होतं. कथित आरोपाचा व्हिडिओ वा ऑडिओ नाही. मात्र त्यांनी महिलेवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठविला होता. दिलेल्या मुदतीत सरकार कारवाई करण्यास अपयशी ठरल्याने हे नाव उघड केल्याचे चोडणकरांनी सांगितले म्हटलं होतं.

गिरीश चोडणकरांच्या आरोपानं खळबळ

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी सत्ताधारी पक्षातील मंत्र्याने एका महिलेवर अत्याचार केल्याचा गौप्यस्फोट करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. तत्पूर्वी गिरीश यांनी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेऊन त्या मंत्र्याचे नाव राज्यपालांना सांगितले आहे.

स्वत: व्हिडीओ पाहिला – चोडणकर

मुरगावचे भाजप आमदार मिलिंद नाईक हे बिहारमधील एका महिलेचे लैंगिक शोषण झालेल्या कथित सेक्स स्कँडलमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितलंय की, नाईक यांचा सहभाग सिद्ध करणारा व्हिडिओ त्यांनी स्वतः पाहिला होता. दोन दिवसांपूर्वी चोडणकर यांनी राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतली होती. तसेच या स्कँडलमधील त्यांच्या कथित सहभागामुळे नाईक यांना भाजपच्या मंत्रिमंडळातून वगळण्यात यावे, अशी मागणी केली होती.

इतर बातम्या :

डेटा गोळा करण्याबाबत आघाडी सरकारने टाळाटाळ केली तर भाजप आंदोलन छेडणार, चंद्रकांत पाटलांचा इशारा

Omicron Variant : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नवे निर्बंध; वाचा नियमावली

Non Stop LIVE Update
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना.
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.