AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोकर्णचं किर्र जंगल, खतरनाक विषारी सापं, जीव कसा वाचवला? गुहेत राहणाऱ्या रशियन बाईनं सांगितली सापांपासून बचावाची सोपी ट्रीक

या जंगलामध्ये वीस पेक्षा अधिक खतरनाक आणि विषारी प्रजातीचे साप आढळतात, हिंस्त्र प्राणी आहेत? तुला भीती वाटली नाही का? असा प्रश्न या महिलेला यावेळी विचारण्यात आला. त्यावेळी तिने आपण साप आणि प्राण्यांपासून कसं वाचलो याबाबत सांगितलं

गोकर्णचं किर्र जंगल, खतरनाक विषारी सापं, जीव कसा वाचवला? गुहेत राहणाऱ्या रशियन बाईनं सांगितली सापांपासून बचावाची सोपी ट्रीक
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 18, 2025 | 2:15 PM
Share

उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या गोकर्णमध्ये रामतीर्थ नावाचा डोंगर आहे, या भागामध्ये किर्र जंगल आहे, हा प्रदेश चारही बाजुनं विशाल आणि उंच झाडानं वेढलेला आहे. घनदाट जंगलामुळे या भागात सहसा कोणाचाही वावर नसतो. दुसरी गोष्ट म्हणजे या जंगलामध्ये माणसांचा फारसा वावर नसल्यामुळे अनेक हिंस्त्र आणि खतरनाक प्राण्यांचं हे जंगल अश्रयस्थान आहे. या जंगलामध्ये तब्बल वीस पेक्षा अधिक खतरनाक विषारी प्रजातीचे साप आढळून येतात. थोडक्यात काय तर या जंगलामध्ये जाण्याची कोणीही हिंमत करत नाही, आणि गेलाच तर जिंवत परत येईल याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. हा रामतीर्थ नावाचा जो डोंगर आहे, तीथे काही गुफा आहेत. त्यातील एका गुफेमध्ये एक रशियन महिला गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या दोन मुलींसोबत राहात असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे.

या भागांमध्ये वारंवार भूस्खलनाच्या घटना घडतात, असंच एक दिवस भूस्खलन झालं, मातीच्या ढिगाऱ्याखाली कोणी दबलं तर नाही ना? याचा शोध घेण्यासाठी पोलीस या जंगलात पोहोचले, मात्र तिथे त्यांना एका गुहेच्या बाहेर कपडे वाळत घातल्याचं दिसून आलं, एवढ्या घनदाट जंगलामध्ये गुहेत कोण राहात असावं? याबाबत त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. पोलीस या गुहेजवळ गेले, तिथलं दृश्य पाहून त्यांनाही धक्का बसला.

या गुहेमध्ये एक मुलगी खेळत होती, तर तिची छोटी बहीण झोपली होती. त्याचवेळी ही रशियन महिला समोर आली, या महिलेला एवढ्या मोठ्या घनदाट जंगलामध्ये पाहून पोलिसांनाही आश्चर्य वाटलं. पोलिसांनी या महिलेची चौकशी केली, तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे. नीना कुटीना असं या महिलेचं नाव आहे. ती गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या दोन मुलीसह याच जंगलामध्ये राहात आहे. ती आठ वर्षांपू्र्वी भारतात आली होती, मात्र व्हिसाची मुदत संपल्यानंतर देखील भारतातून परत गेलीच नाही.

ती आधी गोव्याला होती, त्यानंतर ती गोव्याहून गोकर्णला आली आणि इथेच आपल्या दोन मुलींसह राहू लागली. दरम्यान आता तिला पुन्हा एकदा रशियाला पाठवण्याची तयारी सुरू आहे. यावेळी तिला एक प्रश्न विचारण्यात आला, की या जंगलामध्ये वीस पेक्षा अधिक खतरनाक आणि विषारी प्रजातीचे साप आढळतात, हिंस्त्र प्राणी आहेत? तुला भीती वाटली नाही का? तेव्हा या महिलेनं दिलेल्या उत्तरामुळे सर्वांना धक्का बसला आहे.

महिला काय म्हणाली?

या महिलेनं सांगितलं की या पद्धतीनं गुहेत राहण्याचा मला खूप अनुभव आहे.आम्ही गुहेत राहात होतो याचा अर्थ असा बिलकूल नाही की आम्ही वाईट परिस्थितीमध्ये होतो, आम्ही इथे आनंदात राहत होतो. राहिला विषारी सापांचा प्रश्न तर ते अनेकदा मला गुहेच्या आसपास देखील दिसायचे, अनेकदा आम्ही ज्या गुहेत राहातो, त्यामध्ये देखील ते घुसायचेय. पण आम्ही त्यांना असं कधीच जाणू दिलं नाही की आमच्यापासून त्यांना धोका आहे, त्यामुळे कधीही संर्पदंशाची घटना घडली नाही, असं, या महिलेनं म्हटलं आहे. एवढंच नाही तर मला प्राण्यांपेक्षा माणसांची जास्त भीती वाटते असंही ही महिला यावेळी म्हणाली.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ