AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : अरे देवा ! सोन्याने पुन्हा फोडला घाम, पण चांदी.. जाणून घ्या आजचे भाव

Gold Price Today 31St March 2026 in Marathi : एका दिवसाच्या स्थिरतेनंतर सोनं-चांदीचे दर पुन्हा वर खाली झाले आहेत. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर मौल्यवान धातूंच्या किमती सातत्याने वरखाली होताना दिसत आहेत. मंगळवारी सोनं-चांदीचे दर किती, जाणून घ्या एका क्लिकवर

Gold Price Today : अरे देवा ! सोन्याने पुन्हा फोडला घाम,  पण चांदी..  जाणून घ्या आजचे भाव
सोन्याचे दर किती ?
| Updated on: Mar 31, 2026 | 8:18 AM
Share

Gold Rate Today In India : आज 31 मार्च 2026, आर्थिक वर्षाचा आज शेवटचा दिवस, आजच्याच दिवशी सोनं आणि चांदीची चाल काही वेगळी पहायला मिळाली. जागतिक तणाव, अशांतात, युद्ध, वरखाली होणारी डॉलरची किंमत या सर्व पार्श्वभूमीवर सर्वसमान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेले मौल्यवान धातू, म्हणजेच सोनं आणि चांदी या दोघांच्याही दरात सतत बदल होत होते. तर आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच आज, मंगळवारी सकाळी सोन्याच्या दरात वाढ झालेली दिसन आली तर चांदी मात्र स्वस्त झाली आहे. एका दिवसाच्या स्थिरतेनंतर आजा सोन्याचे भाव वाढले आहेत. कालच्या घसरणीनंतर आज मात्र सोन्याची चमक वाढली असून दरही वर गेले आहेत. बारातची राजधानी दिल्लीमघ्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रती 10 ग्रॅमसाठी 10 रुपयांनी आणि 22 कॅरेटच्या सोन्याच दरातही 10 रुपयांनी वाढ झाली. दोन दिवसांत 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 180 रुपयांनी तर 22 कॅरेट सोन्याचे भाव 10 ग्रॅमसाठी 160 रुपयांनी वाढले आहेत. तर दुसरीकडे चांदीबद्दल बोलायचं झालं तर कालप्रमाणेच आजही चांदीचे भाव घसरले आहे. दोन दिवसांच्या स्थिरतेनंतर आज एक किलो चांदी ही 100 रुपयांनी स्वस्त झाल्याचं दिसून आलं.

तुमच्या शहरात किती आहेत भाव ?

देशातील 10 प्रमुख शहरांमध्ये 19 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत किती, ते जाणून घेऊया.

शहर  24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव  22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव  18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव
दिल्ली ₹1,48,420 ₹1,36,060 ₹1,11,350
मुंबई ₹1,48,270 ₹1,35,910 ₹1,11,200
कलकत्ता ₹1,48,270 ₹1,35,910 ₹1,11,200
चेन्नई ₹1,50,230 ₹1,36,040 ₹1,37,710
बंगळुरू ₹1,48,270 ₹1,35,910 ₹1,11,200
हैदराबाद ₹1,48,270 ₹1,35,910 ₹1,11,200
लखनऊ ₹1,48,420 ₹1,36,060 ₹1,11,350
पाटणा ₹1,48,320 ₹1,35,960 ₹1,11,250
जयपुर ₹1,48,420 ₹1,36,060 ₹1,11,350
अहमदाबाद ₹1,48,320 ₹1,35,960 ₹1,11,250

चांदीत घसरण

चांदीबद्दल सांगायचं झालं तर सलग दोन दिवस दर स्थिर राहिल्यानंतर दिल्लीत चांदीच्या दरात प्रति किलोग्राम 100 रुपयांनी घट झाली आहे. सध्या दिल्लीत एक किलोग्राम चांदी 2,44,900 रुपयांना विकली जात आहे. इतर प्रमुख महानगरांमध्ये, मुंबई आणि कलकत्ता येथेही चांदीचे हेच दर आहेत. पण चेन्नईमध्ये मात्र एक किलोग्राम चांदीचा भाव हा 2,55,100 रुपये इतरा आहे. म्हणजेच या चार महानगरांमध्ये पाहिलं तर चेन्नईमध्ये चांदी सर्वात महाग आहे.

सोन्यात येणार तेजी की होणार घसरण ?

अलीकडच्या काळात सोन्याच्या दरात घसरण होत असून, अस्थिर व्यापारामुळे हा धातू विक्रमी उच्चांकापेक्षा खूपच खाली व्यवहार करत आहे. व्यापक दबावामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सोन्याच्या विक्रीने त्याच्या किमतीवर दबाव आला आहे. मात्र, कमी दरात होणाऱ्या खरेदीमुळे ही घसरण मर्यादित ठेवली आहे. फिडेलिटी इंटरनॅशनलचे मनी मॅनेजर जॉर्ज फस्टॅथोपोल्क यांच्या नुसार, सोन्याच्या किमतीतील घसरण ही एक महत्त्वपूर्ण गुंतवणुकीची संधी आहे. त्यांच्या मते, महागाईचा धोका, वित्तीय दबाव आणि बाँडची विश्वासार्हता या संरचनात्मक घटकामुळे सोनं मजबूत होईल.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. कोणत्याही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर