AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : सराफा बाजारात मोठी घडामोड, आज सोन्याचा भाव थेट…तुमच्या शहरातील नवे भाव घ्या जाणून

Gold Price Today : जागतिक बाजारीतल अस्थिर वातावरणामुळे सोनं चांदी सातत्याने वरखाली होत आहे, सर्वसामान्य ग्राहकांसाठी हे विकत घेणं आज स्वस्त ठरेल की महाग ? जाणून घ्या आजचे सोनं-चांदीचे भाव

Gold Price Today :  सराफा बाजारात मोठी घडामोड, आज सोन्याचा भाव थेट…तुमच्या शहरातील नवे भाव घ्या जाणून
28 मार्च रोजी सोनं-चांदीचे दर किती ?
| Updated on: Mar 28, 2026 | 9:27 AM
Share

तिकडे इराण-इस्रायल-अमेरिकेत महिन्याभरापासून युद्ध पेटलंय आणि त्याचा परिणाम अख्ख्या जगावर होतोय. या युद्धामुळे सोनं-चांदी या मौल्यवान धातूंचे भावही सतत बदलताना दिसत आहेत. युद्ध सुरू झाल्यावर सोन्याचा भाव 2 लाखांच्या पार गेला होता, मात्र आता सोन्यामध्ये मोठी घसरण पहायला मिळत आहे. असं असंल तरीही दोन्ही धातूंच्या दरात होणारी उलथापालथ कायम आहे. इराणवर पुढील 10 दिवस, म्हणजेच 6 एप्रिलपर्यंत कोणतेही हल्ला केले जाणार नाहीत, असं अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर आता सोन्याचे दर पुन्हा वधारताना दिसत आहेत.

आज, म्हणजेच शनिवार 28 मार्च रोजी सोन्याच्या किंमती पुन्हा तेजी आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये सकाळी 24 कॅरेट सोन्याचे दर वाढून 10 ग्रॅमसाठी 1 लाख 44 हजार 870 रुपये इतकी किंमत झाली. तर मुंबईत हाच भाव 1 लाख 44 हजार 720 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. एक दिवसापूर्वी, दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा भाव 1900 रुपयांनी, म्हणजेच 1.3 टक्क्यांनी घसरून प्रति 10 ग्रॅमसाठी 1 लाख 47 हजार 800 रुपयांवर आला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंससाठी 4416 डॉलर इतका आहे.

देशातील महत्वाच्या शहरांमधील सोन्याचे भाव

दिल्लीत सोन्याची किंमत : दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,44,870 आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,32,810 आहे.

मुंबई, चेन्नई आणि कोलकाता : सध्या मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,32,660 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 1,44,720 रुपये आहे.

पुणे आणि बंगळुरूतील दर : या दोन शहरांमध्ये, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 144720 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 132660 रुपये आहे.

शहर   22 कॅरेट सोन्याचा आज भाव (रुपये)   24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (रुपये)
दिल्ली 132810 144870
मुंबई 132660 144720
अहमदाबाद 132710 144770
चेन्नई 132660 144720
कलकत्ता 132660 144720
हैदराबाद 132660 144720
जयपुर 132810 144870
भोपाळ 132710 144770
लखनऊ 132810 144870
चंडीगड 132810 144870

चांदीची किंमत

सोन्यापाठोपाठ दुसऱ्या मौल्यवान धातू, चांदीबद्दल बोलायचं झालं तर त्याची किंमत मात्र घसरतच चालली आहे. 28 मार्चच्या सकाळी चांदीचा भाव 2,39,900 रुपये प्रति किलोग्राम होता. आदल्या दिवशी, दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचा भाव 11,250 रुपयांनी किंवा सुमारे 5 टक्क्यांनी घसरून 2,30,000 रुपये प्रति किलोग्राम झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा स्पॉट भाव 68.12 डॉलर प्रति औंस आहे. यावर्षी जानेवारीमध्ये चांदीच्या भावाने 4 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?