AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदवार्ता, सरकारने या कामासाठी मुदत वाढवली, होणार मोठा फायदा

UPS- NPS Deadline Extended : केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. युनिफाईड पेन्शन स्कीम आणि नॅशनल पेन्शन स्कीमविषयी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा आता सरकारी कर्मचाऱ्यांना घेता येईल. काय आहे हा निर्णय?

केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदवार्ता, सरकारने या कामासाठी मुदत वाढवली, होणार मोठा फायदा
सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासाImage Credit source: गुगल
| Updated on: Jun 24, 2025 | 9:13 AM
Share

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता येऊन ठेपली आहे. केंद्र सरकारने पेन्शन योजनेविषयी कर्मचार्‍यांना दिलासा दिला आहे युनिफाईड पेन्शन स्कीम (UPS) आणि नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) यांच्या निवडीसाठी मुदत वाढ दिली आहे. आता कर्मचाऱ्यांना पुढील तीन महिन्यांचा कालावधी वाढून मिळाला आहे. कोणती निवृत्ती वेतन योजना स्वीकारायची हे ठरवण्यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 30 सप्टेंबर 2025 ही मुदत वाढ जाहीर केली आहे. सरकारने याविषयीची एक प्रेस नोट जारी केली आहे.

30 जून रोजी संपणार होती मुदत

सोमवारी सरकारने एक सूचना जारी केली. त्यानुसार, या योजनांसाठी पात्र केंद्रीय कर्मचारी, निवृत्त कर्मचारी आणि दिवंगत निवृत्त कर्मचार्‍यांचा पती, पत्नी यांना योजनेच्या निवडीसाठी मुदत वाढ देण्यात आली. यापूर्वी त्यांना 30 जून 2025 रोजीपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी ही अंतिम मुदत वाढवण्याचा आग्रह केला होता. त्यानंतर सरकारने राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आणि एकत्रिकृत निवृत्ती वेतन योजना निवडीविषयी मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला. कर्मचाऱ्यांना आता 30 सप्टेंबर 2025 पर्यंत त्यांचा निर्णय कळवावा लागेल. त्यानंतर अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढण्याची शक्यता कमी आहे. या पेन्शन योजनेविषयी गेल्या दोन वर्षात मोठा खल झाला आहे. त्यामुळे सरकार पुन्हा मुदत वाढवण्याची शक्यता तशी धुसरच आहे.

तीन महिन्यांचा कालावधी

केंद्राच्या निर्णयाने कर्मचार्‍यांना आता UPS अथवा NPS यापैकी एक निवृत्ती वेतन योजना निवडण्याची संधी मिळेल. ते विचारपूर्वक त्यावर निर्णय घेऊ शकतील. सरकारकडून युनिफाईड पेन्शन स्कीमसाठी अर्ज स्वीकारण्यास या 1 एप्रिल 2025 रोजीपासून सुरूवात झाली होती. त्यासाठी 30 जून 2025 ही मुदत वाढ देण्यात आली होती. आता 30 सप्टेंबरनंतर मुदत वाढ मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचार्‍यांनी आताच त्यांची भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकारची मुभा देण्यात येणार नाही. कर्मचारी, त्यांच्या नातेवाईकांचे नुकसान होऊ शकते. त्यांचा कोणत्याही प्रकारचा अर्ज स्वीकारल्या जाणार नाही. या मुदत वाढीच्या कालावधीतच कर्मचाऱ्यांना या योजनेची निवड करावी लागेल.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.