AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran-Israel War :खाद्यतेलाला महागाईची फोडणी, आता जादा दाम मोजा, इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम

Edible Oil Inflation : इराण-इस्त्रायलचे युद्ध मध्य-पूर्वेत सुरू असले तरी त्याचे परिणाम आता भारतात पण दिसू लागले आहे. खाद्यतेलाला महागाईची फोडणी बसली आहे. ग्राहकांचा खिशावर ताण येण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेल, सिलेंडरच नाही तर आता किचनवर सुद्धा युद्धाचे परिणाम दिसण्याची शक्यता आहे.

Iran-Israel War :खाद्यतेलाला महागाईची फोडणी, आता जादा दाम मोजा, इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम
खाद्यतेलाच्या किंमती महागल्याImage Credit source: गुगल
| Updated on: Jun 24, 2025 | 8:36 AM
Share

इराण-इस्त्रायल संघर्ष थांबण्याची सध्या चिन्ह दिसत नाहीत. या दोन्ही देशात संघर्ष सुरू असतानाच अमेरिका सुद्धा त्यात उतरली आहे. या युद्ध भडकू नये यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहेत. शांततेसाठी बोलणी सुरू असली तरी हल्ले-प्रतिहल्ले सुरूच आहे. युद्धाचे परिणाम आता भारतावर सुद्धा दिसू लागले आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडर महागण्याचा दावा करण्यात येत असतानाच आता खाद्यतेलाने महागाईच्या मोर्चावर पहिली आघाडी उघडली आहे. खाद्यतेलाच्या किंमती वाढल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर ताण येणार आहे.

घाऊक बाजारात खाद्यतेलाचा भडका

इराण-इस्रायल युद्धात आता अमेरिकेने उडी घेतल्याने संघर्षाची ही स्थिती बराच काळ अशीच राहण्याची चिन्हे आहेत. यामुळे जगभरातून खाद्यतेलाला मागणी वाढत आहे. कच्च्या मालाचे भाव वाढले आहेत. त्यामुळे खाद्यतेलाच्या दराने उसळी घेतली आहे. मार्केट यार्डमधील घाऊक बाजारात सर्व प्रकारच्या तेलाचे दर किलोमागे तीन ते चार रुपयांनी तसेच पंधरा लिटर, किलोच्या डब्यामागे ५० ते ६० रुपयांनी वाढले आहेत.

युद्ध सुरू होण्यापूर्वी केंद्र सरकारने आयात शुल्क १० टक्क्याने कमी केले होते. त्यामुळे खाद्यतेलाचे दर काही प्रमाणात कमी झाले होते. मात्र, इराण-इस्रायल युद्धामुळे खनिजतेलाच्या किमती बॅरलमागे सहा डॉलर्सनी वाढल्या आहेत. त्यामुळे सरकी, पाम आणि सूर्यफूल तेलाच्या दरांत वाढ झाली. जगभरातून मागणी वाढल्याने घाऊक बाजारात किलोमागे ३ ते ४ रुपयांनी वाढ झाली आहे.

खाद्यतेल पुरवठा साखळीवर परिणाम

सॉल्वेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (SEA) भूराजकीय तणाव, जागतिक अस्थिरता, खासकरून इराण-इस्त्रायल युद्धामुळे खाद्य तेलाच्या किंमतीचा भडका उडण्याची शक्यता यापूर्वीच वर्तवली होती. खाद्यतेलाच्या किंमती वाढण्याची भीती खरी ठरली. खाद्यतेलाचा पुरवठा करणारे जहाज अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांची गती मंदावली आहे. त्यातच इराणच्या संसदेने स्ट्रेट ऑफ होर्मूज जलमार्ग बंद करण्याचा ठराव मंजूर केला. अनेक वस्तूंच्या पुरवठ्यावर त्याचा थेट परिणाम होईल. मागणी आणि पुरवठा याचे गणित न जुळल्यास अनेक वस्तूंच्या किंमती भडकण्याची भीती व्यक्त होत आहे. तर काहींच्या मते, रशिया, चीन, तुर्कीची मध्यस्थी हे युद्ध थांबवू शकते. इराण अणू ऊर्जा कार्यक्रमाविषयी माहिती देण्यास राजी होऊ शकतो. जगाला कोणतेही युद्ध परवडणारे नाही अशी सर्वच देशांची भूमिका आहे.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.