AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran-Israel War : तिसरं महायुद्ध जवळ? इराणने केली जगाची कोंडी, स्ट्रेट ऑफ होर्मूजचे महत्त्व काय?

Strait Of Hormuz Closure : अमेरिकेने फोर्डो, नतांज आणि इस्फहान, इराक मधील या तीन अणूऊर्जा प्रकल्पावर हल्ला केला. तर तिकडे इराणी संसदेने 'स्ट्रेट ऑफ होर्मूज' बंद करण्यास मंजूरी दिली. त्यामुळे आता जगाची मोठी कोंडी झाली आहे.

Iran-Israel War : तिसरं महायुद्ध जवळ? इराणने केली जगाची कोंडी, स्ट्रेट ऑफ होर्मूजचे महत्त्व काय?
इराण-इस्त्रायल युद्धाचे साईड इफेक्टImage Credit source: गुगल
| Updated on: Jun 23, 2025 | 3:06 PM
Share

Iran Israel War : मध्य-पूर्वेत दिवसागणिक परिस्थिती बिघडत आहे. इराण आणि इस्त्रायलमधील लढाईत आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेने फोर्डो, नतांज आणि इस्फहान, इराक मधील या तीन अणूऊर्जा प्रकल्पावर हल्ला केला. तर तिकडे इराणी संसदेने ‘स्ट्रेट ऑफ होर्मूज’ बंद करण्यास मंजूरी दिली. इराणने जणून जगाची कोंडी केली आहे. त्यामुळे इंधन तुटवडा नाही तर इतरही अनेक वस्तूंचा व्यापार आणि वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

स्ट्रेट ऑफ होर्मूज इतके महत्त्वाचे का?

जगातील जवळपास 20 टक्के इंधन आणि गॅसचा पुरवठा, वाहतूक ही होर्मूज मार्गे होते. या जलमार्गाच्या एका बाजूला इराणची सीमा तर दुसर्‍या बाजूला ओमान आणि UAE हे दोन देश आहेत. हा मार्ग पर्शियन आखाताला अरबी समुद्र आणि हिंद महासागराला जोडतो. त्याच्या सर्वात अरूंद ठिकाणी 33 किलोमीटर रुंद असा कालवा इराणला अरबी द्वीपकल्पापासून स्वतंत्र करतो. उत्तरेला इराण तर दक्षिणेला अरब सागर आहे. याच समुद्री मार्गाने जवळपास एक तृतीयांश तेलवाहक जहाज जातात. आता इराणी संसदेने हा समुद्रीमार्ग बंद करण्यास मंजूरी दिल्याने एक प्रकारे नाकाबंदी झाली आहे. इराणने कोंडी केल्याने तेलाची, इंधनाची वाहतूक थांबेल आणि जगात इंधनाचे दर भडकतील. व्यापारावर विपरीत परिणाम होईल. काही वृत्तांनुसार, हा जलमार्ग ताब्यात घेण्यासाठी अमेरिका अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. या ठिकाणी वचक ठेवण्याची अमेरिकेची जूनी रणनीती आहे. या जलमार्गावर जवळपास 33 कोटी 39 लाख लिटर कच्चा इंधनाचा पुरवठा करण्यात येतो.

भारतावर किती होईल परिणाम?

अमेरिकन ऊर्जा माहिती प्रशासनानुसार, या जलमार्गे कच्चा तेलाचा पुरवठा करण्यात येतो. त्यात भारत, जपान, दक्षिण कोरिया, चीन सारख्या आशियायी देशांचा 80-85 टक्के वाटा असतो. म्हणजे जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयात करणारा भारत, एकूण कच्चा तेलाच्या जवळपास 40 टक्के आणि नैसर्गिक गॅसचा जवळपास अर्धा भाग होर्मुज जलमार्गाने (Strait Of Hormuz) आयात करतो. भारताचे इस्त्रायल, इराण आणि या भागातील सर्वच देशांशी चांगले संबंध असल्याने पुरवठ्यावर परिणाम होणार नसल्याचा दावा करण्यात येत आहे. इंधन आणि नैसर्गिक गॅससाठी रशिया, अमेरिका आणि ब्राझील या देशातून इंधन आयातीचा एक पर्याय भारतासमोर आहे. पण जगातील इतर देशांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.

अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.