AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran- Israel-America War : युद्धाच्या झळा! पेट्रोल-डिझेलच नाही तर गॅस सिलेंडर पण महागणार?

LPG Cylinder Price Hike : इराणच्या तीन अणुप्रकल्पांसह मोक्याच्या ठिकाणी अमेरिकेने हल्ले चढवले. परिणामी जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक पट्ट्यातून इंधन पुरवठा थांबण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेलच नाही तर गॅस सिलेंडर महागण्याची शक्यता आहे.

Iran- Israel-America War : युद्धाच्या झळा! पेट्रोल-डिझेलच नाही तर गॅस सिलेंडर पण महागणार?
इराण-इस्त्रायल युद्धात भारतीय होळपळणारImage Credit source: गुगल
| Updated on: Jun 23, 2025 | 8:39 AM
Share

भारतीयांचं किचन बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. भारतीय स्वयंपाक घरात उपयोगात येणाऱ्या प्रत्येकी तीन पैकी दोन सिलेंडर हे पश्चिम आशियातून येतात. इराण-इस्त्रायल युद्धात अमेरिकेने काल उडी घेतली. अमेरिकेच्या ताज्या हल्ल्याने युद्ध वाढण्याची शक्यता आहे. सध्या जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक पट्ट्यातून इंधन पुरवठा थांबण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेलच नाही तर गॅस सिलेंडरच्या किंमती भडकण्याची दाट शक्यता आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसण्याची शक्यता आहे.

अमेरिकेच्या ताज्या हल्ल्याने तणाव वाढण्याची भीती

इराणच्या अणुप्रकल्प ठिकाणांवर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक क्षेत्रातून इंधन पुरवठ्यात अडथळा आला आहे. अमेरिकेच्या ताज्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील या क्षेत्रात तणाव वाढला आहे. इंधनासह एलपीजीच्या किंमती वाढण्याची भीती आहे. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य भारतीयांवर दिसेल. खिशावर ताण येईल.

वापर दुप्पट, परदेशावर भिस्त

गेल्या एका दशकात सरकारच्या प्रयत्नानंतर भारतात एलपीजीचा वापर जवळपास दुप्पट झाला आहे. 33 कोटी घरात एलपीजी गॅसचा वापर करण्यात येतो. भारत यासाठी दुसर्‍या देशांवरच अवलंबून आहे. एकूण एलपीजीचा जवळपास 66 टक्के वाटा परदेशाचा आहे. त्यातील जवळपास 95 टक्के वाटा हा सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात आणि कतार या पश्चिम आशियातील देशामधील आहे.

केवळ 16 दिवसांचा साठा

इकोनॉमिक टाईम्सच्या वृ्त्तानुसार, पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारताकडे आयात टर्मिनल, रिफायनरीज आणि बॉटलिंग प्लँट्समध्ये केवळ 16 दिवस पुरेल इतक्याच साठ्याची क्षमता आहे. तर पेट्रोल आणि डिझेलबाबत भारत हा निर्यातदार झाला आहे. भारत कच्चे तेल आयात करतो. त्यावर प्रक्रिया करून त्याची निर्यात करण्यात येते. आता जर हे युद्ध अजून ताणल्या गेले अथवा या युद्धात रशिया, चीन पैकी कोणी उतरलं तर युद्ध दीर्घकाळ चालण्याची भीती आहे. त्यामुळे इराणमधील इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम होईल. भारताने अमेरिकेकडून इंधन आयात कमी केली आहे. रशिया आणि पश्चिम आशियायी देशातून ती वाढवली आहे. युद्धामुळे पुरवठ्यावर परिणाम झाल्यास गॅससह पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.