.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : एका मालगाडीची दुसऱ्या मालगाडीला जोरदार धडक, दोन्ही गाड्या रेल्वे रुळावरच पलटी; अपघात इतका भयंकर की…

आज पहाटे पहाटेच दोन मालगाड्यांचा भीषण अपघात झाला आहे. रुळावर उभ्या असलेल्या मालगाडीला दुसऱ्या मालगाडीने जोरदार धडक दिल्याने मालगाडीचे 12 डब्बे रेल्वे रुळावरून घसरले आहेत.

Video : एका मालगाडीची दुसऱ्या मालगाडीला जोरदार धडक, दोन्ही गाड्या रेल्वे रुळावरच पलटी; अपघात इतका भयंकर की...
| Updated on: Jun 25, 2023 | 8:28 AM
Share

बांकुडा : ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघाताची घटना ताजी असतानाच आज आणखी एक भीषण अपघात झाला आहे. रेल्वे रुळावर उभ्या असलेल्या मालगाडीला समोरून येणाऱ्या मालगाडीने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की मालगाडीचे 12 डब्बे रेल्वे रुळावरून घसरले. या अपघातात कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही. मात्र, दुसऱ्या मालगाडीचा मोटरमन जखमी झाला आहे. पश्चिम बंगालच्या बांकुडा येथे ही दुर्घटना घडली आहे.

आज पहाटे 4 वाजता ही भीषण दुर्घटना घडली. एक मालगाडी बांकुराहून बिष्णूपूर येथे जात होती. त्यावेळी ओंदा रेल्वे स्टेशनवरील रेल्वे रुळावरील लूप लाइनवर आणखी एक मालगाडी उभी होती. मागून येणाऱ्या दुसऱ्या मालगाडीने रेल्वे रुळावरील मालगाडीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयंकर होता की मालगाडीचे डब्बे पटरीवरून उतरून एकमेकांवर चढले. मालगाडीचे एकूण 12 डब्बे रेल्वे रुळावरून उतरले आहेत. दोन्ही मालगाड्या रेल्वे रुळावरच पलटी झाल्या आहेत. त्यामुळे इतर रेल्वे सेवांवरही परिणाम झाला आहे. या अपघातामुळे पुरुलिया हावडा एक्सप्रेस रद्द करण्यता आली आहे. अनेक ठिकाणी एक्सप्रेस थांबवण्यात आल्या आहेत. तर पोरबंदर संतरागाछी एक्सप्रेसला पुरुलिया स्टेशनहून चांडील टाटानगर मार्गे पाठवले जात आहे.

व्हिडीओ व्हायरल

या रेल्वे अपघाताचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात ट्रेनचं इंजिन ट्रॅकच्या बाहेर गेल्याचं दिसत आहे. मालगाड्यांचे अनेक डब्बे पटरीवरून उतरले आहेत. एका मालगाडीचं प्रचंड नुकसान झाल्याचंही या व्हिडीओतून दिसत आहे. सुदैवाने हा मालगाडीचा अपघात असल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. फक्त एका ड्रायव्हरला मार लागला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच मालगाडीचा अपघात झाल्याची माहिती मिळताच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी मदत कार्यास सुरुवात केली आहे. तसेच रेल्वे रुळावरून मालगाडीचे डब्बे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे.

चौकशी होणार

दरम्यान, मालगाड्यांच्या या अपघाताची चौकसी होणार आहे. अधिकाऱ्यांची एक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. ज्या डब्ब्यांचं अधिक नुकसान झालंय ते डब्बे आधी रुळावरून हटवले जात आहेत. या अपघातानंतर आता उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. मालगाड्यांऐवजी एक्सप्रेसचा अपघात झाला असता तर मोठी जीवितहानी झाली असती असं सांगितलं जात आहे. नुकताच ओडिशाच्या बालासोर येथे मोठा रेल्वे अपघात झाला होता. या अपघातात 250 हून अधिक लोक ठार झाले होते. तर तब्बल एक हजार प्रवासी जखमी झाले होते.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर