मोदींवरील माहितीपटाने वादळ, डॉक्यूमेंट्री काढण्याचे का दिले केंद्राने आदेश?

केंद्र सरकारने सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मला दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, ब्रिटनमधील ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने बनवलेल्या माहितीपटाला परराष्ट्र मंत्रालयाने अपप्रचार म्हणून संबोधले आहे, जो निष्पक्ष नसून वसाहतवादी मानसिकतेचा आहे.

मोदींवरील माहितीपटाने वादळ, डॉक्यूमेंट्री काढण्याचे का दिले केंद्राने आदेश?
पंतप्रधान नरेंद्र मोदी Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 22, 2023 | 7:50 AM

नवी दिल्ली : ‘बीबीसी’ने तयार केलेल्या एका माहितीपटावरुन (BBC documentary)देशभरात वादळ उठले आहे. हा माहितीपट सर्व सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवरुन काढण्याचे आदेश केंद्र सरकारने (modi goverment) दिले आहेत. तसेच या माहितीपटावरून निवृत्त अधिकारी, माजी न्यायमूर्तीनी ‘बीबीसी’ला फटकारले आहे. हा माहितीपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बदनामीच्या हेतूने केल्याचे म्हटले आहे. बीबीसीने मात्र माहितीपटाचे समर्थन केले आहे.

काय आहे माहितीपटात?

‘बीबीसी’ने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्यावर ‘इंडिया: द मोदी क्वेशन’ (India: The Modi Question) नावाच्या माहितीपट केला आहे. हा माहितीपट गुजरात दंगलीबाबत आहे. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. माहितीपटातून मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.दंगलीशी संबंधित काही घटकांवर दोन भागांचा हा माहितीपट आहे. भारतात हा अजून प्रसारीत झाला नसला तरी यूट्यूब व ट्विटरवर त्याचा काही लिंक आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

यामुळे केंद्र सरकारने हा माहितीपट शेअर करणारे व्हिडिओ ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहे. तसेच ट्विटरलाही ट्विट काढण्याचे सांगितले आहे. नवीन माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार केंद्राने दिलेल्या या आदेशानंतर सर्वच सोशल मीडिया प्लॅटफार्मवरुन हा माहितीपट काढला गेला आहे. केंद्र सरकारने सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मला दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, ब्रिटनमधील ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने बनवलेल्या माहितीपटाला परराष्ट्र मंत्रालयाने अपप्रचार म्हणून संबोधले आहे, जो निष्पक्ष नसून वसाहतवादी मानसिकतेचा आहे.

बीबीसीकडून समर्थन

बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीवरुन देशभरात वादळ उठले असताना बीबीसीने मात्र समर्थन केले आहे. प्रवक्त्याने निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च संपादकीय प्रमाणकांनुसार या माहितपट तयार केला आहे. त्यात सखोल संशोधन करण्यात आले आहे.बीबीसीच्या या दाव्यासंदर्भात ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक म्हणाले होते की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी जे चित्र उभे करण्याचा प्रयत्न झाला, त्याच्याशी आम्ही सहमत नाही. यासंदर्भात ब्रिटिश सरकारची भूमिका आधीपासूनच स्पष्ट आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या वंशविच्छेदाचे समर्थन करीत नाही.

बीबीसीकडे तक्रार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आक्षेपार्ह चित्रण केल्याबद्दल ब्रिटनमधील भारतीय समुदायाने नाराजी व्यक्त केली आहे. अनेक सदस्यांनी बीबीसीकडे तक्रार केली आहे. भारतीय वंशाचे लॉर्ड रामी रेंजर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, बीबीसीने लक्षावधी भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच भारतीय पोलीस आणि भारतीय न्यायसंस्थेचा अवमान केला आहे. आम्ही पूर्वग्रहदूषित वार्ताकनाचाही निषेध करतो.

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.