Good News | सरकार स्वस्त दरात टोमॅटो विकणार, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात टोमॅटो खरेदीला सुरुवात
राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED) आणि NCCF यांनी आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदीला सुरुवात केली आहे.

मुंबई : देशात आज काही ठिकाणी केंद्र सरकारने टोमॅटो (TOMATO RATE) कमी दरात विकण्याची तयारी केली आहे. दिल्ली, लखनऊ, पटना अशा मोठ्या शहारात पासून स्वस्त टोमॅटोची विक्री होणार आहे. दोन दिवसांपूर्वी अन्न मंत्रालयाच्या ग्राहक व्यवहार विभागाने (NAFED) टोमॅटोच्या किमती वाढल्या असल्यामुळे, त्याला कुठेतरी आळा बसवा म्हणून आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून (MAHARASHTRA NEWS IN MARATHI) या राज्यातून टोमॅटो खरेदी करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहेत.
या शहरात मिळणार स्वस्त ?
ज्या मोठ्या शहरात मागच्या एक महिन्यापासून टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ आजपासून ९० रुपये किलो दराने टोमॅटो विकणार आहेत. त्याची तयारी सुरु झाली आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात टोमॅटो खरेदीला सुरुवात केली आहे.
जिथं महाग तिथं जास्त विक्री
बुधवारी सहकारी संस्था नाफेड आणि राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ यांनी महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यातून टोमॅटो खरेदी करण्याचे आदेश दिले होते. समान्य जनतेला सध्या टोमॅटोचे दर परवडत नसल्यामुळे सरकार ते टोमॅटो खरेदी करुन जनतेला स्वस्त दरात विकणार आहे. मागच्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या किमती प्रचंड वाढत आहेत.
मोबाईल व्हॅन आणि ट्रकातून होणार विक्री
मोबाईल गाडी आणि ट्रकमधून विकण्याची पूर्ण तयारी झाली आहे. आजपासून त्या विक्रीला सुरुवात होणार आहे. त्याची विक्री नाफेड आणि एनसीसी आउटलेटवर केली जाईल. त्याचबरोबर मोबाईल व्हॅन आणि ट्रकातून विक्री होण्याची शक्यता आहे.
देशात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला, टोमॅटोचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळं टोमॅटोच्या किमती 200 रुपये किलोने वाढल्या आहेत. मागच्या एक महिन्यापासून टोमॅटोचे दर वाढले आहेत. त्या ठिकाणी अधिक टोमॅटो विक्री केले जाणार आहेत. विशेष म्हणजे सध्या टोमॅटो सामान्य लोकांच्या जीवनातून हद्दपार झाला आहे.
केंद्रीय मंत्रालयाचं म्हणणं आहे की, जुलै, ऑगस्ट आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात टोमॅटोचं उत्पादन एकदम कमी होतं. त्याचबरोबर मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात सुध्दा उत्पादन वाढीला अडचण निर्माण होते.
दिल्ली आणि आस पासच्या परिसरात हिमाचल प्रदेशातून टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक होती. त्याचबरोबर दक्षिणेकडची राज्य टोमॅटोसाठी अधिक अग्रणी आहेत. नाशिक जिल्ह्यातून लवकरचं टोमॅटो बाजारात येतील. त्यानंतर बाजारात टोमॅटोचे भाव कमी होतील.
