Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुजरात काँग्रेसला मोठा धक्का, 10 वेळा आमदार राहिलेले राठवा यांचा राजीनामा, भाजपमध्ये करणार प्रवेश..?

मे महिन्यातच मोहन सिंग राठवा यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी आता मला तरुणांना संधी द्यायची असल्याचे स्पष्ट केले होते.

गुजरात काँग्रेसला मोठा धक्का, 10 वेळा आमदार राहिलेले राठवा यांचा राजीनामा, भाजपमध्ये करणार प्रवेश..?
Follow us
| Updated on: Nov 08, 2022 | 7:05 PM

अहमदाबाद: गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला जबर मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते आणि 10 वेळा आमदार राहिलेले मोहन सिंह राठवा यांनी मंगळवारी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. राठवा आता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, त्यांनी अद्याप याला दुजोरा दिलेला नसल्याचेही सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राठवा पक्षावर नाराज असल्याचे सांगण्यात येत होते, त्यामुळेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगण्यात आले आहे.

यापूर्वी मे महिन्यातच मोहन सिंग राठवा यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी आता मला तरुणांना संधी द्यायची असल्याचे स्पष्ट केले होते. छोटा उदयपूरचे ज्येष्ठ आणि विद्यमान आमदार म्हणून राठवा यांची ओळख आहे.

त्यावेळी त्यांनी मी आता निवडणूक लढवणार नाही, तरुणांना संधी मिळाली पाहिजे असं त्यांनी त्यावेळी मत मांडले होते. मी सलग 11 वेळा निवडणूक लढवली, त्यापैकी 10 वेळा मी जिंकून आलो आहे.

आणि जेतपूर पवी, बोडेली आणि छोटा उदयपूर तालुक्यातील मतदारांनी मला सर्वाधिक वेळा जिंकून गुजरात विधानसभेत पाठवले असल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखवली होती.

राजकारणातील तरुणांचा सहभाग याविषयी बोलताना त्यांनी सांगितले होते की, राजकारणात आता तरुणांना संधी दिली पाहिजे.

त्यावेळी त्यानी छोटा उदयपूर तालुक्यातील 3 गावांतील लहान मुलांना प्राथमिक शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्याचे सांगत मी विधानसभेत अनेकवेळा याची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले होते.

विशेष म्हणजे मोहन सिंग राठवा निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून जोरदा सुरू होती. त्यानंतर त्यांनीच माध्यमांसमोर येत त्यांनी मी निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले.

दुसरीकडे, मोहनसिंग राठवा यांचे मधले पुत्र राजेंद्रसिंग राठवा हे गावोगावी लग्नसमारंभ, भजनाला हजेरी लावून मतदारांच्या सतत संपर्कात असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे त्यांचीही जोरदार चर्चा सुरू आहे.

मोहन सिंग राठवा यांनी 1980 आणि 1985 मध्ये काँग्रेस उमेदवार अमरसिंह राठवा यांच्या विरोधात जनता पक्षाचे उमेदवार म्हणून 1980 आणि 1985 मध्ये दोनदा लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले होते.

2002 ची गुजरात विधानसभा निवडणूक त्यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढवली आणि तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि गुजरातमधील जातीय दंगलींमध्ये मोहनसिंग राठवा यांना भाजपच्या वेचतभाई बारिया यांनी रोखले. मात्र त्यानंतरही ते जिंकत राहिला.

'बोलता येईना, डोळे वाकडे'; बाबासाहेब पाटलांच्या विधानावर मुंडे म्हणाले
'बोलता येईना, डोळे वाकडे'; बाबासाहेब पाटलांच्या विधानावर मुंडे म्हणाले.
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक.
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं...
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं....
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं.
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका.
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन.
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल.
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल.
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?.
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक.