AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gujrat | सुरतमध्ये फूटपाथवर झोपलेल्या मजुरांना डंपरने चिरडलं, 15 जणांचा मृत्यू

या दुर्घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी आहेत.

Gujrat | सुरतमध्ये फूटपाथवर झोपलेल्या मजुरांना डंपरने चिरडलं, 15 जणांचा मृत्यू
| Updated on: Jan 19, 2021 | 9:19 AM
Share

सुरत : गुजरातच्या सुरतमध्ये (Surat Accident) सोमवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली (Truck Crushes 22 Labours Sleeping On Footpath). येथे एका डंपरने लहान मुलांसह 22 जणांना चिरडले. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी आहेत. जखमींना सध्या सुरतच्या स्मीमेर रुग्णालयात (SMIMER Hospital) दाखल करण्यात आलं आहे. हे सर्व मजूर होते आणि रात्री रस्त्याच्या कडेला फूटपाथवर झोपलेले होते. झोपेतच या मजुरांवर काळ आला आणि 15 जणांसाठी कालची रात्र अखेरची ठरली (Truck Crushes 22 Labours Sleeping On Footpath).

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना सुरतच्या पालोद गावात घडली. सर्व मृत हे मजूर होते. ते फूटपाथवर झोपलेले होते. त्यावेळी ऊसाचा ट्रॅक्टर आणि डंपर आमोरासमोर आले. यावेळी डंपरचालकाचं नियंत्रण सुटलं आणि तो डंपर फूटपाथवर झोपलेल्या मजुरांवर गेला. हे सर्व मजूर राजस्थानचे राहणारे असल्याचं सांगण्यात येत आहे.

सहा महिन्यांची चिमुरडी वाचली

मिळेलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत सहा महिन्यांचं एक स्त्री जातीचं बाळ वाचलं आहे. पण, तिच्या आई-वडिलांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. मृत्यू झालेले सर्व मजूर हे राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगड येथील राहणारे असल्याची माहिती आहे. सध्या मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे. तर जखमींवर उपचार सुरु आहेत (Truck Crushes 22 Labours Sleeping On Footpath).

सुरतच्या किम रोडवर मृत्यूचं तांडव

सोमवारी गुजरातच्या सुरत येथील किम रोडच्या कडेला फूटपाथवर 22 मजूर झोपलेले होते. यावेळी रस्त्यावर एक डंपर आणि एक ट्रॅक्टर आमोरासमोर आले. त्यामुळे डंपर टालकाचा डंपरवरील टाबा सुटला आणि डंपर फूटपाथवर चढला. येथे झोपलेल्या 22 मजुरांना या डंपरने चिरडले. या घटनेत डंपरचा चक्काचूर झाला. यावरुन हा अपघात किती भीषण होता, याचा अंदाज लावता येतो. सध्या सुरत पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. (Truck Crushes 22 Labours Sleeping On Footpath)

संबंधित बातम्या :

RIP Pista : ‘बिग बॉस’ची क्रू मेंबर पिस्ता धाकडचा दुचाकी खड्ड्यात आदळल्यानं मृत्यू

संक्रांत साजरी करण्यासाठी गोव्याला जाताना भीषण अपघात, दहा महिलांचा मृत्यू

VIDEO | काँग्रेस आमदाराच्या गाडीला भीषण अपघात, कारचा चक्काचूर

मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटले, मर्सिडीज दुभाजकावर आदळून मुंबईत अपघात

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.