Ahijeet Dipke: “ज्ञानू यांना जावचं लागेल”, अभिजीत दिपके यांचा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना थेट इशारा
Abhijeet Dipke on Gyanesh Kumar: केंद्रीय निवडणूक आयोगावरून वातावरण तापलेले असतानाच काल मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, इतर दोन आयुक्तांची बैठक झाली. त्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्याचवेळी सीजेपीचे नेते अभिजीत दिपके यांनी मोठा इशारा दिला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगातील कथित मतभेदानंतर काल आयोगाच्या तीनही आयुक्तांची संयुक्त बैठक झाली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सहकारी आयुक्त सुखबीर सिंह संधू, विवेक जोशी बैठकीला उपस्थित होते. त्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्याचवेळी कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी ज्ञानेश कुमार यांना इशारा दिला आहे.
“ज्ञानू यांना जावेच लागेल”
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरून राजकीय वातावरण तापलेले आहे. मतदारा याद्यांची विशेष सखोल पुनर्निरीक्षण(SIR), ज्ञानेश कुमार यांची कार्यशैली आणि इतर निर्णयावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. काल झालेल्या बैठकीनंतर निवडणूक आयोगाने जे निर्णय घेतले, त्यावरून कुठेतरी पाणी मूरत होते आणि एक प्रकारे आयोगाने त्रुटी दूर करण्याचाच प्रयत्न केल्याचा दावा करण्यात येत आहे.
दरम्यान कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष हे पुन्हा ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आक्रमक झाले. “ज्ञानू यांना जावेच लागेल” अशी भूमिका त्यांनी जाहीर केले. त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांवर जोरदार हल्लाबोल केला. कालची बैठक आणि निर्णयावरून सीजेपीने ज्ञानेश कुमार यांना धारेवर धरले.
माजी मुख्य सचिवांच्या दाव्याने मोठी खळबळ
केरळमचे माजी मुख्य सचिव जी. के. थॉमसन यांनी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यांच्या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी त्यांना 2016 मध्ये एका विमान प्रवासादरम्यान भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवण्याची आणि मंत्रीपद मिळवून देण्याची खुली ऑफर दिल्याचा दावा थॉमसन यांनी केला आहे. या दाव्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. हा दावा समोर येताच अभिजीत दिपके यांनी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. यापूर्वी सीजेपीने त्यांना राजीनामा देण्यासाठी 48 तासांची मुदत दिली होती. या काळात मुख्य आयुक्तांनी राजीनामा दिला नाही. आता सीजेपी मुंबईतून आंदोलन छेडणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांनी निवडणुकीत मॅच फिक्सिंग केल्याचा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना अम्पायर करून निवडणुकीत मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान या आरोपांवर ज्ञानेश कुमार यांची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
