सीबीआयला विरोध करणं म्हणजे कायद्यालाच आव्हान, महाराष्ट्र सरकार दिशाहीन; हंसराज अहिर बरसले

महाराष्ट्रात सीबीआयला परवानगी शिवाय प्रवेश न देण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतल्याने त्यावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर संतापले आहेत.

सीबीआयला विरोध करणं म्हणजे कायद्यालाच आव्हान, महाराष्ट्र सरकार दिशाहीन; हंसराज अहिर बरसले

नवी दिल्ली: महाराष्ट्रात सीबीआयला परवानगी शिवाय प्रवेश न देण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतल्याने त्यावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर संतापले आहेत. महाराष्ट्रात सीबीआयला प्रवेश नाकारणे म्हणजे कायद्यालाच आव्हान देण्यासारखं आहे, असं सांगत ठाकरे सरकार दिशाहीन झालंय, अशी घणाघाती टीका हंसराज अहिर यांनी केली आहे. (hansraj ahir on Thackeray Government withdraws permission to CBI in Maharashtra)

महाराष्ट्रात सीबीआयला विरोध करणे म्हणजे कायद्याला आव्हान देण्यासारखं आहे. सीबीआयच्या चौकशीला अशाप्रकारे विरोध करणं चुकीचं आहे, असं हंसराज अहिर यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकार दिशाहीन असून आचार आणि विचार न करणारं हे सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. तसेच पंतप्रधा नरेंद्र मोदी यांच्या दाढी आणि चेहऱ्यावरून टीका करणं योग्य नसल्याचा टोलाही त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना लगावला आहे.

खडसेंच्या जाण्याचं दु:ख

एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय दुर्देवी असून तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, असं सांगतानाच त्यांचं पक्षातून जाण्याचं दु:ख आहे, असं ते म्हणाले. कोरोनाच्या लसीवर संशोधन सुरू आहे. ही लस तयार होईल, याचा आत्मविश्वास आहे. त्यामुळेच ही लस मोफत देण्याचं आश्वासन दिलं आहे, असं सांगत त्यांनी भाजपच्या बिहारमधील जाहिरनाम्यातील आश्वासनाची पाठराखण केली.

राज्य सरकारचा काय होता निर्णय

अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी झालेल्या महाराष्ट्र पोलीस आणि सीबीआय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयाने महाराष्ट्रात तपास करण्यासाठी सीबीआयला दिलेली सर्वसाधारण परवानगी मागे घेतली आहे. त्यामुळे यापुढे सीबीआयला कोणत्याही प्रकरणी महाराष्ट्रात तपास करण्यासाठी आधी परवानगी घ्यावी लागणार आहे.

ठाकरे सरकारने सीबीआयची सर्वसाधारण परवानगीचा निर्णय मागे घेतल्याने याचा परिणाम अनेक प्रकरणांवर होणार आहे. आता सीबीआयला महाराष्ट्रात तपास करण्यासाठी येण्याआधी राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. (hansraj ahir on Thackeray Government withdraws permission to CBI in Maharashtra)

संबंधित बातम्या:

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, परवानगीशिवाय CBI ला महाराष्ट्रात एन्ट्री नाही

राज्याची सूत्रं लवकर ताब्यात घ्या, जलमंदिर पॅलेसमधील भेटीनंतर उदयनराजेंच्या दरेकरांना शुभेच्छा

(hansraj ahir on Thackeray Government withdraws permission to CBI in Maharashtra)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *