AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हरी नरके यांची महान शास्त्रज्ञ, भारतरत्न, डॉ.अब्दुल कलाम यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट व्हायरल

या फेसबुक पोस्टवर विविध प्रतिक्रिया उमटत आहे. कुणी परखड बोलले असं म्हणत प्रा. नरके यांचं कौतुक केलंय. तर कुणी त्यांच्या टीकेचं खंडन केलंय.

हरी नरके यांची महान शास्त्रज्ञ, भारतरत्न, डॉ.अब्दुल कलाम यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट व्हायरल
Image Credit source: social media
| Updated on: Oct 15, 2022 | 12:59 PM
Share

अभिजित पोते, पुणेः प्रा. हरी नरके (Hari Narke) यांच्या फेसबुक पोस्टमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ अब्दुल कलाम (APJ Abdul Kalam) यांच्या जयंतीनिमित्त देशभरात वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. मात्र अब्दुल कलाम यांचं राष्ट्रपती (President) म्हणून देशासाठी काय योगदान आहे, असा सवाल करत प्रा. नरके यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. अब्दुल कलाम खरं तर इंजिनिअर होते, पण त्यांना लोकांनी शास्त्रज्ञ करून टाकलं. मिसाइलचा शोध जर्मनीत लागला, त्यावेळी अब्दुल कलाम पाळण्यात होते. मिसाइल बनवणं हे संशोधन नव्हे, असं वक्तव्य प्रा. हरि नरके यांनी केलंय…

या फेसबुक पोस्टवर विविध प्रतिक्रिया उमटत आहे. कुणी परखड बोलल्याबद्दल प्रा. नरके यांचं कौतुक केलंय. तर कुणी त्यांच्या टीकेचं खंडन केलंय.

प्रा. हरी नरके यांची फेसबुक पोस्ट जशास तशी….

कलामांचा वाचनाशी संबंध काय? प्रा. हरी नरके
विभुतीपुजा आणि दैवतीकरण या मध्यमवर्गाच्या लाडक्या गोष्टी. एखादी व्यक्ती जर हिंदुत्ववादी असेल तर त्या सुमार किंवा B+ श्रेणीतील व्यक्तीचा विशेष प्राविण्य गटात समावेश करून त्याच्या आरत्या ओवळायला मध्यमवर्गाला फार आवडते. उदा. आंबापुत्र किडे गुरुजी म्हणे अणुशास्त्रज्ञ आहेत. उद्या हे मोबाईल मेकॅनिक, स्टो दुरुस्त करणारे, स्कूटर मेकॅनिक यांचाही “शास्त्रज्ञ” म्हणून उदोउदो करतील.
१) APJ अब्दुल कलाम हे एक इंजिनियर (तंत्रज्ञ, टेक्निशियन) होते. पण त्यांना या मंडळींनी शास्त्रज्ञ घोषित करून टाकले. मला सांगा कलामांनी असा कोणता शोध लावला? मिसाईल बनवणे हे संशोधन नव्हे. ती एक मशीन आहे. तिचा शोध कलामांनी लावलेला नाही. तो जर्मनीत लागला.तेव्हा कलाम पाळण्यात होते.
हे म्हणजे चहा विकणारा माणूस हाच चहाचा संशोधक असल्याचे ढोल पिटणे होय.
२) कलामांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस का? किती ग्रंथसंग्रह होता कलामांचा? कोणती पुस्तके त्यांनी वाचली होती? ग्रंथसंस्कृती, वाचन संस्कृती यांच्या विकासाला कोणता हातभार त्यांनी लावला? माणूस मुस्लिम असून शंकराचार्यांच्या पुढे लोटांगण घालीत होता, यापलीकडे कलामांचे कला, साहित्य,संस्कृती, वाचन, ग्रंथजगत, यासाठी योगदान काय? त्यांनी गरिबीत दिवस काढले. हे खरेच आहे की त्यांचे आत्मचरित्र वाचनीय आहे. ते सतत प्रकाशझोतात असणारे शासकीय अधिकारी होते. हिंदुत्ववाद्यांचे ते डार्लिंग होते.म्हणून त्यांना भारत रत्न व राष्ट्रपतीपद दिले गेले.
३) राष्ट्रपती म्हणून त्यांचे देशाला विशेष योगदान काय होते?
४) संसदेच्या प्रांगणात महात्मा जोतीराव फुले यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण होणार होते. तेव्हा कलाम राष्ट्रपती असल्याने त्यांच्या हस्ते ते व्हावे म्हणून आम्ही त्यांना निमंत्रण दिले.
कोण महात्मा फुले? असे विचारून त्यांनी या कार्यक्रमाला यायला थेट नकार दिला. त्यांचे वाचन, त्यांचे जनरल नॉलेज इतके थोर होते की त्यांना महात्मा फुले माहीतच नव्हते.
( पुतळ्याचे अनावरण उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष व विरोधी पक्षनेते यांच्या उपस्थितीत पार पडले. )
५) आज महाराष्ट्रातली साक्षरता ९० टक्क्यांपेक्षा अधिक असून त्यातल्या सर्वांनी वाचन करावे असे प्रयत्न झाल्यास वाचनसंस्कृती आणखी वाढेल व ती वाढलीच पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी झटायला हवे. पण वाचन कमी होतेय अशी नकारात्मक बोम्ब मारल्याने हे काम पुढे जाईल की मागे?
६) ज्याकाळात शिक्षण ही फक्त ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य पुरुषांची मक्तेदारी होती तेव्हा स्त्रियांमध्ये शून्य टक्के वाचन असणार. ते आता वाढलेय की शूण्याच्याही खाली गेलेय? जेव्हा बलुतेदार, अलुतेदार, दलित, आदिवासी,भटके निरक्षर होते तेव्हा पालावर, पाड्यावर, झोपडीत, शेतात वाचन नसणारच. आता हे घटक शिकल्यावर तिथे जे काही वाचन होतेय ते का मोजले जात नाहीये? की जसे टी.आर.पी मोजताना हे लोक विचारात घेतले जात नाहीत, तसच इथंही चालुय? ज्या लोकांना “आम्ही मूठभर म्हणजेच देश” असे वाटते, ते वाचतात म्हणजे देश वाचतोय, त्यांचे वाचन कमी झाले म्हणजे थेट देशाचे वाचन कमी झाले असे वाटते त्यांनी केलेली ही ओरड दिशाभूल करणारी आहे. खोटी आहे. आज जिथे वाचनालये व पुस्तक विक्री केंद्रे आहेत तिथले १०% लोक वाचतात. हे आजवरचे सर्वोच्च वाचन असले तरी त्यात आणखी खूप वाढ व्हायला हवीच.
७) वाचन कमी झालंय असं बोलणारे केवळ ओपिनियनमेकर आहेत म्हणून तुम्हीही (स्वतंत्र विचार न करता) त्याच कळपात सामील होणार का? की नव्या घरांमध्ये होऊ लागलेल्या वाचनाचे स्वागत करणार? ते आणखी वाढावे यासाठी सक्रिय होणार? वाचनाने करमणूक, ज्ञान, आधुनिकता आणि माणूसपण समृद्ध होते.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.