शेतकऱ्यांना काठीचीच भाषा समजते, त्यांना जशास तसे उत्तर द्या; भाजपच्या ‘सीएम’चं ‘खट्टर’नाक विधान

तीन कृषी कायदे रद्द करावे म्हणून तब्बल वर्षभरापासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी उग्र आंदोलनही केले होते. (Haryana Cm Manohar Lal Khattar Advice Tit For Tat Action Against Farmers)

शेतकऱ्यांना काठीचीच भाषा समजते, त्यांना जशास तसे उत्तर द्या; भाजपच्या 'सीएम'चं 'खट्टर'नाक विधान
Cm Manohar Lal Khattar
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 12:05 PM

चंदीगड: तीन कृषी कायदे रद्द करावे म्हणून तब्बल वर्षभरापासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी उग्र आंदोलनही केले होते. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरीही आंदोलन करत असून देशभरातील शेतकरीही आंदोलनात सहभागी झाले आहेत. या कायद्यांविरोधात शेतकऱ्यांमध्ये संताप असतानाच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. शेतकऱ्यांना काठीचीच भाषा समजते. हातात एक हजार काठ्या घ्या. शेतकऱ्यांचा बंदोबस्त करा. त्यांना जशास तसे उत्तर द्या, असं विधानच मनोहरलाल खट्टर यांनी केलं आहे. त्यामुळे देशभरातील प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

सीएम मनोहर लाल खट्टर चंदीगड येथे शेतकऱ्यांच्या एका कार्यक्रमाला आलो होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं. आपल्या परिसरातील एक हजार लोकांनी काठ्या हातात घेऊन शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी जावं आणि शेतकऱ्यांचा बंदोबस्त करावा, असं खट्टर म्हणाले. खट्टर एवढंच बोलून थांबले नाहीत तर शेतकऱ्यांना जशास तसे उत्तर द्या. फार काय दोन तीन महिने तुरुंगात राहाल तर मोठे नेते व्हाल. जामिनाची काही चिंता करू नका, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

खट्टर नेमकं काय म्हणाले?

आपल्या विभागातील 500, 700, 1000 शेतकऱ्यांचा ग्रुप तयार करा. त्यांना स्वयंसेवक बनवा. आणि काठ्या हातात घेऊन जशास तसे उत्तर द्या. तुम्ही चिंता करू नका. फार काय तुम्ही एक महिना, तीन महिने किंवा सहा महिने तुरुंगात जाल. पण मोठे नेते व्हाल. तुमचं नाव इतिहासात नोंदवलं जाईल, असं खट्टर म्हणाले.

असं कोणी बोलतं का?

खट्टर यांच्या या विधानावर संयुक्त किसान मोर्चाने संताप व्यक्त केला आहे. तसेच खट्टर यांनी सर्व शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणीही किसान मोर्चाने केली आहे. तर, एखाद्या मुख्यमंत्र्यांनी असं चिथावणीखोर विधान करायला हवं का?; असा चिमटा काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी काढला आहे.

हा तर देशद्रोह

काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनीही खट्टर यांच्यावर टीका केली आहे. खट्टरजी तुम्ही भाजप कार्यकर्त्यांना आंदोलक शेतकऱ्यांवर हल्ला करायला सांगत आहात. शेतकऱ्यांवर हल्ला करा, तुरुंगात जा आणि नेते बनूनच बाहेर या, हा तुमचा गुरुमंत्र कधीच यशस्वी होणार नाही. संविधानाची शपथ घेऊन उघडपणे अराजकता पसरवणं हा देशद्रोह आहे. कदाचित मोदी, नड्डा यांची तुमच्या विधानाशी सहमती असेल, असा खोचक टोला सुरजेवाला यांनी लगावला आहे.

संबंधित बातम्या:

शेतकऱ्यांना चिरडणं ही तुमची पॉलिसी आहे काय?, संजय राऊत मोदी-योगींवर तुटून पडले

Lakhimpur Kheri Violence : यूपीत हिंसाचार भडकला, लखनऊमध्ये पोलिसांची गाडीही जाळली, अखिलेश म्हणाले-पोलिसांकडूनच गाडी जाळण्याचा प्रकार

पती-पत्नी सोबत राहू शकत नसतील, तर एकमेकांना सोडलेलं बरं : सुप्रीम कोर्ट

(Haryana Cm Manohar Lal Khattar Advice Tit For Tat Action Against Farmers)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.