AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain : देशातील अनेक भागांत पावसांचा कहर, दिल्लीतील पावसाचा ४१ वर्षांचा विक्रम तुटला

Rain : राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 27 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. परंतु दिल्ली, हिमाचल प्रदेश, राजस्थान अन् चंदीगढमध्ये धुवांधार पाऊस सुरु आहे. दिल्लीत पावसाचा विक्रम मोडला गेला आहे.

Rain : देशातील अनेक भागांत पावसांचा कहर, दिल्लीतील पावसाचा ४१ वर्षांचा विक्रम तुटला
Delhi rain
| Updated on: Jul 09, 2023 | 4:35 PM
Share

नवी दिल्ली : देशभरात मान्सूनचा जोर चांगलाच सुरु आहे. मुसळधार सुरु असलेल्या पावसामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये महापूर आला आहे. हिमाचल प्रदेशात ४० वर्ष जुना असलेला पूल वाहून गेला आहे. नवी दिल्लीत पावसाचा ४० वर्षांचा विक्रम तुटला आहे. पावसामुळे दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि चंदीगडमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागाने जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

दिल्लीत विक्रम तुटला

दिल्लीत मुसळधार पावसामुळे ४१ वर्षांचा विक्रम तुटला आहे. यापूर्वी १९८२ मध्ये सर्वाधिक १५३ मिमी पाऊस झाला होता. त्यानंतर २०२४ मध्ये २४ तासांत आता १५३ मिमी पाऊस झाला आहे. आता पुढील २४ तासांत मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्किम, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, मणिपुर, त्रिपुरा, ओडिशा, गुजरात, गोवा आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हिमाचलमध्ये मोठे नुकसान

हिमाचल प्रदेशात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. कुल्लू, मनालीमधील अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. मनालीहून अटल टनल ते रोहतांग दरम्यान जाणारा रस्ता बंद झाला आहे. मुसळधार पावसामुळे कुल्लू मनाली, पाण्याखाली गेले आहे. या भागातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसामुळे १० आणि ११ जुलै रोजी शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत पावसामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये ब्यास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. चंडीगड-मनाली राष्ट्रीय महामार्गाचा काही भाग वाहून गेला आहे. तसेच अनेक दुकाने आणि एटीएममध्ये पाणी शिरले आहे.

जम्मूत दोन जवानांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. पुंछमध्ये पोशाना नदी ओलांडताना दोन जवान वाहून गेले आहे. हिमाचल प्रदेशात नदीवरील पूल वाहून गेला आहे. राजस्थानमध्येही मुसळधार पाऊस सुरु आहे. मागील २४ तासांत राज्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.

दिल्लीत अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द

दिल्लीतील पावसामुळे अधिकाऱ्यांच्या सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व मंत्री आणि अधिकारी रविवारीसुद्धा कार्यालयात दाखल झाले आहे. नुकसानग्रस्त भागांचा दौरा करण्याचे आदेश मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.