Hubli fire: हुबळीत भीषण अग्निकांड, चार जणांचा होरपळून मृत्यू, खासगी कारखान्यात लागली आग

नक्की किती लोक मरण पावलेत याचा तपास करण्यात येत आहे. हा सर्व तपशील अद्याप समजू शकलेला नाही. घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान, बचाव पथक आणि हुबळी ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली असून आग विझविण्याचे आणि बचाव कार्य युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

Hubli fire: हुबळीत भीषण अग्निकांड, चार जणांचा होरपळून मृत्यू, खासगी कारखान्यात लागली आग
हुबळीत अग्निकांड Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 4:01 PM

हुबळी –  कर्नाटकातील (Karnataka)तारीहाला औद्योगिक क्षेत्रात एका स्पार्कलर फॅक्टरीत लागलेल्या आगीत (fire in factory) चार जणांचा मृत्यू (four dead)झाल्याची माहिती आहे. फॅक्टरीत गॅस सिलिंडर फुटल्याने ही आग लागली असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. या दुर्घटनेत 8 मजूर जखमी झाल्याची माहिती होती, त्यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक होती, त्यातील चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. शनिवारी ही आग लागली होती त्यानंतर जखमींना हुबळीच्या केआयएमएस या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान, बचाव पथक आणि हुबळी ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली असून आग विझविण्याचे आणि बचाव कार्य युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची भीती

या दुर्घटनेत आठ मजूर होरपळले होते. त्यातील गडग जिल्ह्यातील विजयलक्ष्मी यांचा काल रात्री मृत्यू झाला होता. त्यानंतर रविवारी सकाळी गौरववा आणि मलेशा या दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर आणखी एका जणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते आहे. जखमी झालेले आठही जण गंभीर असल्यामुळे त्यातील मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात येते आहे.

फॅक्टरी अनधिकृत असल्याचा दावा

बर्थडे कँडल्स बवनवणारी ही स्पार्कलर कंपनी होती. हुबळीच्या तरिहाला औद्योगिक क्षेत्रात ती १५ दिवसांपूर्वीच सुरु करण्यात आली होती. ही फॅक्टरी अनधिकृत असल्याचे सांगण्यात येते आहे. या फॅक्टरीत झालेल्या स्फोटात ८ मजूर जखमी झाले, त्यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर या फॅक्टरीचा मालक तब्सुम शेख फरार झाला आहे. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करीत असून फरार मालकाचा शोधही घेण्यात येतो आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.