AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Us,Israel Iran War : इराणचा मित्र अखेर युद्धाच्या मैदानात, इस्त्रायलवर भीषण हल्ला, थेट एका मागून एक…, जग हादरलं

युद्धभूमीतून मोठी बातमी समोर आली आहे, आता इराणचा मित्र मैदानात उतरला असून, इस्त्रायलवर भीषण मिसाईल हल्ला करण्यात आला आहे. यामुळे अमेरिका आणि इस्त्रायलची चिंता वाढली आहे.

Us,Israel Iran War : इराणचा मित्र अखेर युद्धाच्या मैदानात, इस्त्रायलवर भीषण हल्ला, थेट एका मागून एक..., जग हादरलं
Iran Israel WarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 30, 2026 | 3:09 PM
Share

इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद केला आहे. स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद झाल्यामुळे जगातील अनेक देशांवर इंधन टंचाईचं मोठं संकट कोसळलं आहे. इराणने जरी आपल्या काही मित्र देशांसाठी स्ट्रीट ऑफ होर्मूज खुला केला असला तरी या मार्गाने आता पूर्वी इतकी तेलाची वाहतूक करणं शक्य होत नाहीये. तर दुसरीकडे आता आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे, गेल्या काही दिवसांपासून अमेरिका इराणसोबत युद्धविरामचा प्रयत्न करत आहे, मात्र यामध्ये अजूनही यश आलेलं नाही त्यातच आता या युद्धामध्ये हुती बंडखोरांची एन्ट्री झाली आहे.

यमनची राजधानी असलेल्या सनावरून हुती बंडखोरांनी इस्त्रायलवर भीषण मिसाईल हल्ला केला आहे. यामुळे आता फक्त इस्त्रायल आणि अमेरिकेचंच टेन्शन वाढलं नाहीये तर संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं आहे. आधीच या युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद आले, त्यानंतर आता आणखी दोन समुद्री मार्ग बाब-अल-मंडेब सामुद्रधुनी आणि सुएझचा कालवा देखील हुती बंडखोरांकडून बंद केला जाण्याची शक्यता आहे. जर हे दोन रस्ते एकाचवेळी बंद झाले तर संपूर्ण जगाला याचा मोठा फटका बसणार आहे, कारण फक्त तेलाचीच वाहतूक नाही तर संपूर्ण वाहतूकच बंद होऊन, निर्यात -आयात ठप्प होऊ शकते. याचा सर्वात मोठा फटका हा युरोपीयन राष्ट्रांना बसू शकतो.

मध्य पूर्वेत तीन प्रमुख व्यापारी मार्ग आहेत, त्यातील महिला मार्ग म्हणजे होर्मूज, दुसरा बाब अल मंडेब आणि तिसरा सुएझचा कालवा. हे तीन मार्ग बंद झाले तर याचा जगातील सर्वच देशांना मोठा फटका बसू शकतो. भारताच्या देखील अडचणी यामुळे वाढणार आहेत. काही दिवसांपूर्वी हुती बंडखोरांकडून या युद्धात उतरण्याचे संकेत देण्यात आले होते. अखरे हुती बंडखोरांची या युद्धात एन्ट्री झाली आहे. हुती बंडखोरांनी यमच्या राजधानीमधून इस्त्रायलवर भीषण मिसाईल हल्ला केला आहे. या युद्धात आता हुती बंडखोरांची एन्ट्री झाल्यामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात