AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसींना किती मुले आहेत? त्यात किती मुले किती मुली?
भाजप नेत्या नवनीत राणा आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी सध्या त्यांना किती मुले असावीत आणि किती नसावीत यावर चर्चा करत आहेत. त्यामुळे असदुद्दीन ओवैसी यांना किती मुले आहेत याची चर्चा रंगली आहे. चला जाणून घेऊया त्या विषयी...

महाराष्ट्रात भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनी हिंदूंनी चार-चार मुले जन्माला घालायला हवीत असे म्हटले होते. त्यानंतर या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. आता यावर एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, ते चार काय आठ मुले जन्माला घालतील, आम्हाला काय? त्यानंतर नवनीत राणा शांत बसल्या नाहीत. त्यांनी उत्तर देत म्हटले की, ओवैसी यांना पाकिस्तानात पाठवले पाहिजे. हे सर्व सुरु असताना आता ओवैसी यांना एकूण किती मुले आहेत याची चर्चा सुरु आहे. चला जाणून घेऊया त्याविषयी…
ओवैसी यांच्या किती मुली आणि किती मुले?
हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या मुलांबाबत जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहोत. ओवैसी यांचे लग्न फरहीन ओवैसी यांच्याशी झाले आहे. त्यांना ६ मुले आहेत. त्यात त्यांच्या पाच मुली आहेत. त्यांची नावे खुदसिया ओवैसी, यासमीन ओवैसी, अमीना ओवैसी, महेन ओवैसी आणि अतिका ओवैसीस अशी आहेत. त्यांचा एक मुलगा देखील आहे. त्याचे नाव सुल्तानुद्दीन ओवैसी आहे. सर्वजण हैदराबादच्या शास्त्रीपुरमच्या मेलर्देवपल्लीत राहतात. त्यांची सर्वात मोठी मुलगी खुदासिया ओवैसी यांचे २४ मार्च २०१८ रोजी आलम खान यांच्याशी लग्न झाले. त्यांची दुसरी मुलगी डॉ. यासमीन ओवैसी यांचे लग्न डॉ. आबिद अली खान यांच्याशी झाले. त्यांची तिसरी मुलगी अमीना ओवैसी यांचे लग्न फहद बेग यांच्याशी झाले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण, का होत आहे संपूर्ण राजकीय वाद?
भाजप नेते नवनीत राणा यांनी हिंदूंनी चार-चार मुले जन्माला घालण्याची गोष्ट सांगितली होती. त्यानंतर राजकीय गदारोळ माजला होता. त्यांनी म्हटले होते की, एखाद्या मौलवीला ऐकले होते की, ते १९ मुलांपासून खुश नाहीत. भारताला वाचवायचे असेल तर हिंदूंनी कमीत कमी चार मुले करावीत. याच्यावर ओवैसी यांनी वक्तव्य केले. त्यांनी महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अमरावतीत म्हटले की, माझी सहा मुले आहेत. तुम्हाला चार मुले जन्माला घालण्यापासून कोण रोखत आहे? महाराष्ट्रात दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या लोकांना पंचायत निवडणुकीत उभे राहण्याची परवानगी नाही. हा नियम तेलंगणात देखील लागू होता. बदलला गेला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या उपस्थितीत तीनपेक्षा जास्त मुले जन्माला घालण्याबाबत बोलले होते.
ओवैसी पाकिस्तानात जाऊन १०-२० मुले जन्माला घालोत
एआयएमआयएम प्रमुखांच्या उत्तरावर पुन्हा नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेते नवनीत राणा म्हणाल्या, ‘लोकशाही बदलत आहे. ओवैसी यांना यावर बोलले पाहिजे. जर तुम्हाला या देशात राहायचे असेल तर तुम्हाला संविधानाचा आदर करावा लागेल. असदुद्दीन ओवैसी यांना पाकिस्तानात पाठवले पाहिजे. तिथे जाऊन ते १० नाही, २० मुले जन्माला घालोत.’
