हेरगिरी केली, बदल्यात ज्योती मल्होत्राला पाकने किती रुपये दिले, धक्कादायक माहिती समोर!
यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला अटक करण्यात आली आहे. सध्या तिची चौकशी केली जात आहे. तिच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होते आहेत.

Youtuber Jyoti Malhotra : यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तिची सध्या चौकशी चालू असून रोज नवनवी माहिती समोर येत आहे. ज्योती भारतातील तसेच पाकिस्तानमधील अनेक अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती, अस म्हटले जात आहे. असे असतानाच हेरगिरी करण्याच्या बदल्यात तिला नेमके किती रुपये मिळायचे? असे विचारले जात आहे.
भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानात पोहोचू नये म्हणून…
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक मोठे निर्णय घेतले आहे. भारताने पाकिस्तानी नागरिकांना भारतातून जाण्याचा आदेश दिला आहे. तसेच पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनाही भारताने पाकिस्तानात पाठवलं आहे. भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानात पोहोचू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एवढी सारी खबरदारी घेतलेली असूनही ज्योती मल्होत्रा ही पाकिस्तानाला गुप्त माहिती देत होती असे समोर आले आहे.
ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल आहे. ट्रॅव्हल विथ जो या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून ती चांगली कमाई करायची. मात्र आता तिच्यावर पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना तिने गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ज्योती मल्होत्रा किती रुपये कमवायची?
ज्योती ही मुळची हरियाणा राज्यातील हिसार येथील आहे. ती तिच्या यूट्यूब चॅनेलवर भारत तसेच पाकिस्तानला फिरायला गेलेले व्हिडीओ टाकायची. तिचे यूट्यूबवर लाखो सबस्क्रायबर्स आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ती चांगली कमाई करत होती. ती महिन्याला साधारण 1.5 लाख रुपये कमवायची, असे सांगितले जात आहे. आता मात्र हेरगिरीचे आरोप झाल्यानंतर तिच्या प्रतिमेवर तसेच तिच्या कमाईवर नकारात्मक परिणाम पडू शकतो.
ज्योती मल्होत्रा ही पाकिस्तानमध्ये अली अहवा, शाकीर, राणा शहाबाज यांना भेटली होती. तिने शाकीरचा नंबर जट्ट रंधावा या नावाने सेव्ह केला होता. ती शाकीरच्या व्हॉट्सअॅप, स्नॅपचॅट, टेलिग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत संपर्कात होती.
पाकिस्तान नेमके किती पैसे द्यायचा?
हवालाच्या माध्यमातून ज्योतीने पैसे घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे. हेरगिरीच्या आरोपाखाली ज्योतीसोबत इतरही लोकांना अटक करण्यात आलं आहे. यामध्ये गजाला, यामीन मोहम्मद दानीश, देविंदर सिंह ढिल्लो, अरमान आदींचा समावेश आहे. हे सर्व पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार ज्योती मल्होत्रा हिला हेरगिरीच्या बदल्यात भरपूर पैसे मिळायचे. मात्र पैशांचा हा आकडा नेमका किती आहे, याची नेमकी आणि अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. याबाबतची माहिती आगामी काळात समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
