अमेरिकेमध्ये एक कप चहाची किंमत किती? भारतीय व्यक्ती चहा विकून दिवसभरात कमावतो इतके पैसे, आकडा ऐकताच बसेल धक्का
तुम्ही कधी विचार केला आहे का? की अमेरिकेत एका कप चहाची किंमती जास्तीत जास्त किती असू शकतो, भारतीय माणूस अमेरिकेत चहा ऐकून प्रचंड कमाई करत आहे, आकडा ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

सध्या इंटरनेटचं युग आहे, त्यामुळे अनेकजण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही गोष्टी करतात, त्या गोष्टी इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मित्रांसोबत शेअर करतात. यामुळेच आपल्याला अनेक गोष्टींबद्दल देखील माहिती मिळत असते. सोशल मीडियावर ज्या काही गोष्टी दाखवल्या जातात, त्या सर्वच काही खऱ्या असतात असं नाही, तर यातील काही गोष्टी या अफवा देखील असू शकतात. मात्र काही गोष्टी या खऱ्या असतात, त्यातील अनेक गोष्टींमधून आपल्याला शिकायला मिळतं, काही व्हिडीओ असे असतात की त्यातून आपल्याला काहीतरी प्रेरणा देखील मिळते, व्यवसायाच्या नव्या कल्पना सुचतात. पैसा कमावण्याचे मार्ग देखील सापडतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक भारतीय व्यक्ती हा अमेरिकेमध्ये चहा विकत असल्याचं पहायला मिळत आहे. चहा विकत असताना तो चहाच्या विक्रीतून दिवसभरात किती पैसे कमावतो हे देखील त्याने सांगितलं आहे.
जे लोक कधीच अमेरिकेमध्ये गेले नाहीत, त्यांना अमेरिकेमध्ये एक कप चहा किती डॉलरला मिळतो, तिथे चहाचे भाव काय आहेत, हे काही माहिती नसते. त्यामुळे हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीने अमेरिकेत एक कप चहा किती डॉलरला विकतो आणि त्याची दिवसभरात कमाई किती होते? याबद्दल माहिती दिली आहे. हा व्हिडीओ पहाण्यासाठी मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये हा तरुण बिहारी स्टाईलमध्ये अमेरिकेत चहा विकताना दिसत आहे. हा व्यक्ती अमेरिकेच्या लॉस एंजिल्समध्ये चहा विकत आहे. त्याने चहा बनवण्यासाठी किती खर्च येतो, चहा कितीला विकला जातो आणि दिवसभर चहा विकून नफा किती होतो, याबद्दल माहिती दिली आहे.
हा व्हिडीओ सोशल मिडीया प्लॅटफॉर्म @chaiguy_la नावाने शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये या व्यक्तीने आपल्या स्टॉलवर विक्रीसाठी ठेवलेले मेनू दाखवले आहेत. तो अमेरिकेत चहा आणि पोहो विकण्याचं काम करतो. तो अमेरिकेत एक कप चहा 8 डॉलर 69 सेंट मध्ये विकतो, म्हणजे भारतीय रुपयांमध्ये सांगायचं झालं तर तो इथे 700 रुपयांना एक चहा विकत आहे. तर एक प्लेट पोह्यांची किंमत 16 डॉलर एवढी आहे. तो दिवसाला चहा आणि पोह्याच्या विक्रीमधून 341 डॉलर एवढे पैसे कमावतो.
