नेपाळमध्ये भारताचे शंभर रुपये किती होतात? तुम्हाला मिळतात एवढे पैसे
जर तुम्ही देखील नेपाळमध्ये जाण्याचा विचार करत असाल किंवा तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की नेपाळमध्ये भारताचे 100 रुपये किती होतात तर याचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

नेपाळमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे, नेपाळ सरकारने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुक, इन्स्टाग्राम, टिक-टॉक सारख्या काही माध्यमांवर बंदी घातली, त्यानंतर या विरोधात नेपाळमधील तरुणाई रस्त्यावर उतरल्याचं पहायला मिळालं. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं, विद्यार्थ्यांनी संसद भवनात घुसून संसदेच्या इमारतीला आग लावली, आंदोलक एवढ्यावरच थांबले नाहीत तर नेपाळमधील अनेक मंत्र्यांच्या घरांवर देखील हल्ला करण्यात आला, दरम्यान त्यानंतर सरकार कोसळलं असून, नेपाळच्या राष्ट्रपती, पंतप्रधानांसह दहा मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडूसह इतर प्रमुख शहरांमध्ये सध्या कर्फ्यू लावण्यात आला असून, सध्या नेपाळची सत्ता तेथील लष्काराच्या हातात आहे.
नेपाळमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे, विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर ज्या लोकांना नेपाळमध्ये पर्यटनासाठी जायचं आहे किंवा काही व्यावसायाच्या निमित्तानं जायचं आहे, असे जगभरातील लोक नेपाळबाबत इंटरनेटवर माहिती सर्च करत आहेत. लोकांना हे देखील जाणून घ्यायचं आहे की भारताचे शंभर रुपये नेपाळमध्ये किती होतात?, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
भारताचे 100 रुपये नेपाळमध्ये किती होतात?
जर तुम्ही देखील नेपाळमध्ये जाण्याचा विचार करत असाल किंवा तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की नेपाळमध्ये भारताचे 100 रुपये किती होतात तर याचं उत्तर आहे, नेपाळमध्ये भारताचे 100 रुपये 159.93 नेपाळी रुपये होतात. याचाच अर्थ जर तुमच्याकडे शंभर रुपये असतील आणि ते तुम्हाला नेपाळी रुपयांमध्ये कनव्हर्ट करून घ्यायचे असतील तर तुम्हाला तिथे 100 रुपयांच्या बदल्यात 159.93 रुपये मिळू शकतात. यामध्ये दर दिवशी थोडा-फार बदल होऊ शकतो, त्यामुळे नेपाळला जाण्यापूर्वी तुम्ही पुन्हा एकदा भारताच्या रुपयांची किंमत नेपाळमध्ये किती होते हे चेक करू शकता.
भारतीय व्यक्तीला जर नेपाळला जायचं असेल तर त्यासाठी त्याला कुठल्याही पासपोर्ट किंवा व्हिसाची आवश्यकता नाहीये, एवढंच नाही तर नेपाळमध्ये असे अनेक ठिकाणं आहेत, जिथे तुम्ही पैसे नेपाळी रुपयांमध्ये कनव्हर्ट न करता थेट खर्च करू शकतात. खास करून नेपाळच्या सीमावर्ती भागामध्ये भारतीय चलन स्विकारलं जातं. मात्र जर तुमच्याकडे 500 किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीच्या नोटा असतील तर त्या नेपाळमध्ये स्विकारल्या जात नाहीत, त्यामुळे तुम्ही ज्यावेळी नेपाळला जण्याचा प्लॅन बनवाल तेव्हा तुमच्याकडे 100 -200 च्या नोटा असणं गरजेच असतं.
