दिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी? फोटोत पुरावा

संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले. पण विशेष गोष्ट म्हणजे त्यांच्या विमानाने थेट अफगाणिस्तानमार्गे अमेरिकेसाठी उड्डाण केले नाही.

दिल्ली ते अमेरिका इतक्या लांबच्या विमान प्रवासात काय करत असतील मोदी? फोटोत पुरावा

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले. पण विशेष गोष्ट म्हणजे त्यांच्या विमानाने थेट अफगाणिस्तानमार्गे अमेरिकेसाठी प्रयाण केले नाही. मोदींच्या विमानाने अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर केला नाही. खरंतर हाच मार्ग थेट आणि कमी वेळ घेणारा आहे. मात्र मोदींनी पाकिस्तानमार्गे अमेरिकेकडे कूच केली. (How PM Modi Spent Time on His Long Flight to the US)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून अमेरिकेसाठी रवाना झाले. यासाठी पाकिस्तान सरकारने परवानगी दिली होती. अफगाणिस्तानमधील परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे. यासाठी भारत सरकारने पाकिस्तानकडे हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी मागितली होती, ज्याला पाकिस्तानी सरकारने सहमती दर्शवली होती.

पंतप्रधान मोदी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांच्यासह उच्च सरकारी अधिकाऱ्यांसोबत विशेष विमानाने अमेरिकेला रवाना झाले. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींच्या उड्डाणासाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी मागण्यात आली होती. पाकिस्तानने सहमती दिल्यानंतर पंतप्रधानांच्या उड्डाणासाठी हा मार्ग ठरवण्यात आला.

नॉनस्टॉप हवाई प्रवास

भारतीय पंतप्रधान पहिल्यांदाच विमानाने नॉनस्टॉप अमेरिकेचा प्रवास करत आहेत. हे शक्य झाले आहे कारण भारतीय विमाने पाकिस्तानी हवाई क्षेत्र वापरून अमेरिकेला उड्डाण करत आहेत. भारतीय व्हीव्हीआयपी वाहतुकीसाठी खरेदी केलेल्या नवीन आणि विशेष सुविधांनी सुसज्ज विमानाची ही पहिलीच अधिकृत अमेरिकावारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना महामारीच्या संकटानंतर पहिल्यांदाच अमेरिकेला गेले आहेत. या दरम्यान भारत आणि अमेरिका यांच्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा होईल. पंतप्रधान मोदी आणि जो बायडेन या बैठकीत सहभागी होतील.

दरम्यान, मोदींच्या विमानाने अमेरिकेच्या दिशेने उड्डाण केल्यानंतर मोदींनी एक फोटो ट्विट केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, “लांब हवाई यात्रा म्हणजे पेपर वर्क पूर्ण करण्याची, कागदी कार्यवाही पूर्ण करण्याची संधी असते.”

किती तासांचा प्रवास?

नवी दिल्ली ते वॉशिंग्टन हा प्रवास 15.30 तासांचा असतो, मात्र पंतप्रधान मोदींचं विमान कोणत्याही थांब्याशिवाय वॉशिंग्टनमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे त्यांचे विमान कमी वेळेत पोहोचले पाहिजे. मात्र मोदींचे विमान थेट अफगाणिस्तानमार्गे न जाता पाकिस्तानमार्गे जात असल्याने त्यांना थोडा जास्त वेळ लागू शकतो. नवी दिल्ली ते न्यूयॉर्कपर्यंत नॉन-स्टॉप फ्लाइटची वेळ 15 तास 30 मिनिटे आहे. नवी दिल्ली आणि न्यूयॉर्क दरम्यान फास्ट वन-स्टॉप प्रवास हा जवळजवळ 19 तासांचा असतो. या प्रवासात विमान दुबईत उतरते. तिथे विमानात पुन्हा एकदा इंधन भरलं जातं आणि मग विमान अमेरिकेकडे मार्गस्थ होते. तथापि, काही एअरलाइन्स स्टॉपओव्हर डेस्टिनेशन आणि प्रतीक्षा कालावधीवर आधारित 30 तासांपेक्षा जास्त वेळ घेतात.

कसं आहे पंतप्रधानांचे स्पेशल विमान?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान बोइंग-777 (Air India one) अनेक फीचर्सनी सुसज्ज असे आहे. हे विमान एकदा इंधन भरल्यानंतर थेट अमेरिकेपर्यंत प्रवास करू शकणार आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यावेळी नॉनस्टॉप अमेरिका प्रवास करत आहेत. या विमानाच्या संचलनाची जबाबदारी एअर इंडियाकडे नाही, तर भारतीय हवाईदलाकडे आहे. या विमानात सुरक्षेची मोठी काळजी घेण्यात आलेली आहे. या विमानाचा वापर पंतप्रधानांसह राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीदेखील करु शकतात.

पंतप्रधानांच्या या खास विमानात विशेष मिटिंग रूमदेखील आहे. लांबच्या प्रवासादरम्यान, पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा त्यांच्यासोबतचे अधिकारी येथे चर्चा, बैठका करु शकतात. तसेच विविध प्रकारचे कामकाज करता येते.

विमानाची किंमत आणि क्षमता

या विमानाची किंमत 8,458 कोटी रुपये इतकी आहे. या विमानात जॅमर बसवण्यात आले आहेत. या जॅमरमुळे शत्रूंच्या रडारचे सिग्नल जॅम होतात. या विमानावर क्षेपणास्त्र हल्ल्याचा देखील परिणाम होऊ शकत नाही. हे विमान हवेत इंधन भरू शकते. पंतप्रधानांचे हे विशेष विमान तब्बल 35 हजार फूट उंचीवरुन ताशी 1013 किमी वेगाने उडू शकते. या विमानाची इंधन टाकी पूर्ण भरली आणि विमानाने उड्डाण केले की हे विमान सलग 6,800 मैल इतकं अंतर पार करण्यास सक्षम आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा कशासाठी?

अमेरिकेत क्वाड देशांची बैठक होणार आहे. यामध्ये भारत-अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया आणि जापानचे पंतप्रधान सामील होतील. या दौऱ्यात तालिबान, चीन आणि कोरोनावर चर्चा होण्याची शक्यता आहे. यानंतर 25 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या सत्राला संबोधित करतील.

मी 22 ते 25 सप्टेंबर दरम्यान अमेरिका दौऱ्यावर आहे. माझ्या अमेरिका भेटीदरम्यान, मी अध्यक्ष जो बायडेन यांच्यासह भारत-अमेरिका व्यापक वैश्विक धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेईन आणि परस्पर हितसंबंधांच्या प्रादेशिक आणि जागतिक समस्यांवर विचारांची देवाणघेवाण करेन, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना भेटण्यासाठीही उत्सुक असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. दोन्ही देशांमधील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सहकार्याच्या संधी शोधण्यासाठी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याशी संभाषणासाठी उत्सुक आहे, असं मोदींनी सांगितलं.

शिखर संमेलन

पंतप्रधान मोदी म्हणाले की, अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानी पंतप्रधान योशीहिडे सुगा यांच्यासह क्वाड शिखर परिषदेत सहभागी होतील.

द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करणे

पंतप्रधान मोदी म्हणाले की ते ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान सुगा यांनाही भेटतील. या बैठकीदरम्यान, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी जपान आणि ऑस्ट्रेलियाशी चर्चा केली जाईल.

महासभेतील भाषणाने समारोप

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पंतप्रधानांच्या भाषणाने मोदींचा दौरा पूर्ण होईल. मोदी म्हणाले, “मी माझ्या भेटीचा समारोप संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला केलेल्या अभिभाषणासह करणार आहे, ज्यामध्ये कोविड -19 महामारी, दहशतवादाचा मुकाबला करण्याची गरज, हवामान बदल आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांसह जागतिक आव्हानांवर लक्ष केंद्रित केले जाईल.”

आपल्या अमेरिका दौऱ्यामुळे अमेरिका-भारत, जपान-भारत यांच्यासह जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत होईल. आपसातील सहयोगाला चालना देऊन व्यावसायिक संबंध सुधारतील असा विश्वास पंतप्रधान मोदींना आहे.

इतर बातम्या

कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजारांची मदत, मोदी सरकारचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र

New Air Chief Marshal : एअर मार्शल व्ही.आर. चौधरी यांची पुढील हवाईदल प्रमुखपदी वर्णी

(How PM Modi Spent Time on His Long Flight to the US)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI