जर तुमच्याकडे खराब झालेला तिरंगा असेल तर तो चुकूनही फेकू नका; जरा इकडे लक्ष द्या…

राष्ट्रध्वज खराब किंवा त्याची स्थिती चांगली नसेल तरच त्याची आपण योग्य प्रकारे विल्हेवाट लावू शकतो. भारतीय ध्वजाची प्रतिष्ठा लक्षात घेऊन सर्व प्रकारचे ध्वज खासगी जाळून किंवा इतर कोणत्याही योग्य पद्धतीने नष्ट करावे लागतात. झेंडे कागदाचे असतील तर ते जमिनीवरही टाकता येत नाहीत, म्हणून त्यांचीही खासगी पद्धतीनेच विल्हेवाट लावली जाऊ शकते.

जर तुमच्याकडे खराब झालेला तिरंगा असेल तर तो चुकूनही फेकू नका; जरा इकडे लक्ष द्या...
महादेव कांबळे

|

Aug 06, 2022 | 7:13 AM

मुंबईः आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजाचा (National flag) अवमान होऊ नये, तो खराब करु नये असे अनेकदा ऐकवलं जाते, आणि आपण अनेकदा ऐकतोही. त्यामुळे आपल्याला नेहमीच वाटते की, तिरंग्याची देखभाल, तो फडकवणे अशी कामं ही आदरानेच केले जातात की. मात्र 15 ऑगस्ट (15th August Independence Day) आणि 26 जानेवारीला (26 January Republic Day) मात्र कागदाचे तिरंगे रस्त्यावर अनेक ठिकाणी विखुरलेले आपल्याला दिसतात. ते झेंडे बघून अनेकदा असंही वाटतं की, आपला तिरंगा फक्त स्वातंत्र्य किंवा प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवापुरताच मर्यादित आहे, आणि त्यानंतर त्याचे काय होते किंवा रस्त्यावर पडला तर काय फरक पडतो असंही वाटण्यासारखी परिस्थिती असते.

आता ‘हर घर हर तिरंगा’ ही मोहीम सुरू झाली आहे, त्यामुळेच या अशा परिस्थितीत आपला राष्ट्रध्वज आणि त्याची घ्यावी लागणारी देखभाली कशी असावी, काय करावे या संबंधीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

ध्वज खराब झाला तर…

देशात 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी आपण अनेक ठिकाणी कार्यक्रम झाला की, आपल्या राष्ट्रध्वज कुठेतरी पडलेला आणि फाटलेल्या अवस्थेत दिसतो. तर रस्त्यावर, आणि ग्राऊंडवर पडलेले ध्वज अनेकदा कचराकुंडीतही फेकले जातात, मात्र ही गोष्टी ही साधी नाही. त्यामुळे रस्त्यावर पडलेला राष्ट्रध्वज उचलून सरळ डस्टबिनमध्ये टाकणे ही गोष्ट सर्वसामान्य वाटत असेल तर थांबा, आणि जरा इकडे लक्ष द्या.

राष्ट्रध्वज कुठेही फेकणे हा  गुन्हाच

आपल्या देशाचा राष्ट्रध्वज कुठेही फेकणे हा खरं तर गुन्हा आहे, आणि हीच गोष्ट अनेकांना माहिती नाही. त्यामुळे आपला राष्ट्रध्वज खराब झाला असेल, फाटलेला असेल तर तो निकामी करणे म्हणजे त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे त्यासाठी नीतिनियम आहे आणि त्यासाठी भारतीय ध्वज संहितेतही माहिती देण्यात आली आहे.

भारतीय ध्वज संहिता 2002

आपल्या देशाच्या भारतीय ध्वज संहिता 2002 नुसार, राष्ट्रध्वज खराब झाल्यानंतर त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे दोन मार्ग सांगितले गेले आहेत पहिला मार्ग म्हणजे ध्वजाला दफन करणे किंवा जाळणे. या दोन्हीपैकी कोणतीही प्रक्रिया निवडताना कठोर नियमांचे पालन हे प्रत्येक देशवासियांना करावे लागते.

खराब झालेल्या राष्ट्रध्वजाची योग्य विल्हेवाट कशी लावायची?

ध्वज दफन करण्यासाठी खराब असलेले ध्वज लाकडी पेटीत गोळा केले जातात, त्यानंतर ते योग्य प्रकारे दुमडले जातात आणि बॉक्समध्येच ठेवले जातात. त्यानंतर तिच पेटी जमिनीमध्ये पुरली जाते. ध्वज जमिनीत पुरल्यानंतर काही काळ मौन पाळावे लागते, आणि ही प्रक्रिया करताना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी शांततापूर्ण वातावरणत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागत असते.

सुरक्षित जागा निवडावी

दुसरा मार्ग म्हणजे योग्य प्रकारे ध्वज जाळणे. आणि ध्वज जाळण्यासाठी आणि स्वच्छ करण्यासाठी सुरक्षित जागा निवडावी लागते. त्यासाठी ध्वजाची व्यवस्थित घडी करावी लागते. त्यानंतर ज्या ठिकाणी ध्वजाची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी लागते त्या ठिकाणी आगीच्या मध्यभागी दुमडलेला ध्वज ठेवावा लागतो.

योग्य मार्ग म्हणजे…

भारतीय ध्वज जाळण्याचा योग्य मार्ग म्हणजे दुमडलेला ध्वज आदराने आगीत ठेवला जाणे. देशाचा ध्वज थेट जाळणे म्हणेज तो कायदेशीर गुन्हा आहे. राष्ट्रध्वज हा न्याय, स्वातंत्र्य, निष्ठा आणि देशाच्या अभिमानाचे प्रतीक आहे, त्यामुळे त्याची काळजी ही प्रत्येकाने घ्यावीच लागते. म्हणूनच ध्वजाची योग्य प्रकारे विल्हेवाट लावताना त्याची प्रतिष्ठा राखणे ही महत्वाची गोष्ट आहे.

सन्मानपूर्वक पुरला जाऊ शकतो

राष्ट्रीय सुट्टी दिवशी तिरंग्याचा भरपूर वापर केला जातो. त्यामुळे त्यादिवशी ध्वजाची विल्हेवाट लावणे सोपे जाते, कारण त्यादिवशी त्याचा आदर ठेवून ध्वजला योग्यप्रकारे एका लाकडी पेटीत घालून तो सन्मानपूर्वक पुरला जाऊ शकतो, त्यासाठी मात्र लाकडी पेटी असणे गरजेचेच आहे.

ध्वज फडकावण्याशी महत्त्वाच्या गोष्टी

ध्वज कोणत्याही ठिकाणी सजावटीच्या वस्तू म्हणून वापरता येत नाही. कोणताही टेबल किंवा व्यासपीठाचा कोणताही भाग झाकण्यासाठी म्हणून ध्वजाचा आपण वापरही करु शकत नाही अथवा तसा केलाही जाऊ नये. तसेच कुषण, रुमाल, अंतर्वस्त्रे किंवा कोणतेही ड्रेस मटेरियल तयार करण्यासाठी किंवा त्यावर छपाई किंवा भरतकामासाठीही त्याचा आपण वापर करु शकत नाही.

तिरंग्याचा वापर

एवढेच नाही तर तिरंग्याचा वापर ड्रेस, गणवेश किंवा कमरेखाली परिधान केलेल्या कोणत्याही प्रकारच्या वस्तूसाठी त्याचा वापर आपण करु शकत नाही, म्हणून राष्ट्रध्वजाची विशेष काळजी प्रत्येक नागरिकांनी ही घेतलीच पाहिजे. ध्वजाचा वापर वस्तू गुंडाळण्यासाठी करू शकत नाही.

असा वापर करू शकत नाही…

खासगी अंत्यविधीसाठीही तिरंगा ध्वज वापरता येत नाही. किंवा कोणत्याही वाहनावर अथवा वाहनाचा कोणताही भाग झाकण्यासाठीही म्हणून त्याचा वापर आपण करु शकत नाही. भारतातील कोणत्याही नागरिकांना आपला राष्ट्रध्वज त्यांच्या कार किंवा दुचाकीवर तिरंगा लावू शकत नाहीत. केवळ काही सरकारी अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या वाहनांवरच फक्त राष्ट्रध्वज लावण्याची परवानगी आहे. त्यांचा उल्लेख भारतीय ध्वज संहितेतही केला गेला आहे. ज्यांच्या वाहनावर तिरंगा लावण्यास परवानगी आहे

या व्यक्तींच्या वाहनावर असतो तिरंगा

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि उपराज्यपाल,परदेशातील भारतीय उच्च पदस्थ व्यक्ती, पंतप्रधान आणि इतर कॅबिनेट मंत्री, केंद्राचे राज्यमंत्री आणि उपमंत्री, कोणत्याही राज्याचे किंवा केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री आणि इतर कॅबिनेट मंत्री, कोणत्याही राज्याचे किंवा केंद्रशासित प्रदेशाचे मंत्री आणि उपमंत्री, लोकसभेचे अध्यक्ष; उपसभापती, राज्यसभा, लोकसभेचे उपसभापती, राज्यांतील विधान परिषदांचे अध्यक्ष; राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील विधानसभांचे स्पीकर, राज्यांमधील विधान परिषदेचे उपाध्यक्ष, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेचे उपसभापती. भारताचे सरन्यायाधीश; सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालयांचे न्यायाधीश.

तरच योग्य प्रकारे विल्हेवाट लावू शकतो

राष्ट्रध्वज खराब किंवा त्याची स्थिती चांगली नसेल तरच त्याची आपण योग्य प्रकारे विल्हेवाट लावू शकतो. भारतीय ध्वजाची प्रतिष्ठा लक्षात घेऊन सर्व प्रकारचे ध्वज खासगी जाळून किंवा इतर कोणत्याही योग्य पद्धतीने नष्ट करावे लागतात. झेंडे कागदाचे असतील तर ते जमिनीवरही टाकता येत नाहीत, म्हणून त्यांचीही खासगी पद्धतीनेच विल्हेवाट लावली जाऊ शकते.

उतरवतानाही पाळावे लागतात नियम

देशाचा राष्ट्रध्वज खूप गतीने फडकवला जात, पण तो उतरवताना त्याचे नियम पाळून तो हळू हळू खाली उतरावावा लागतो, हेही प्रत्येक भारतीयाने लक्षात ठेवले पाहिजे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें