महिलांचे शेकडो मृतदेह; 16 वर्ष …अन् तो सांगड्यांचा फोटो घेऊन पोलीस स्टेशनला पोहोचला, पोलीसही हादरले
धर्मस्थळ हे दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एक छोटसं शहर आहे. हे शहर तेथील शिव मंदिर आणि शातंतेसाठी ओळखलं जातं. मात्र इथून आता एक हादरवणारी बातमी समोर आली आहे.

धर्मस्थळ हे दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एक छोटसं शहर आहे. हे शहर तेथील शिव मंदिर आणि शातंतेसाठी ओळखलं जातं. धर्मस्थळ येथे असलेल्या या शिव मंदिरात दरवर्षी दर्शनासाठी लाखो भाविक येतात. मात्र या शहराचं असं एक रहस्य उघड झालं आहे ज्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. एका सामान्य सफाई कर्मचाऱ्यापासून या गोष्टीची सुरुवात होते. ज्याने 1998 ते 2014 या काळात शेकडो मृतदेह पुरले आहेत. मात्र त्याच्यावर ही वेळ का आणि कोणी आणली? नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घेऊयात.
सुरक्षेच्या कारणामुळे या घटनेतील सफाई कामगाराचं नाव गुप्त ठेवण्यात आलं आहे. या सफाई कामगारानं 1995 मध्ये धर्मस्थळ येथील मंदिर प्रशासनात सफाई कामगार म्हणून आपल्या कामाला सुरुवात केली. त्याचं काम होतं मंदिराचा परिसर आणि नेत्रावती नदीच्या किनाऱ्याची स्वच्छता करणं, तो आपल्या कामात सतत व्यस्त असयाचा, एवढ्या पवित्र जागी आपल्याला नोकरी मिळाली त्यामुळे तो आनंदी होता. मात्र 1998 मध्ये त्याच्या समोर अशा काही गोष्टी आल्या ज्यामुळे त्याचं जीवनच बदलू गेलं.
पहिला मृतदेह आढळला
त्याला नेत्रावती नदीच्या किनारी एका महिलेचा मृतदेह आढळून आला, त्यानंतर वारवांर त्याच्यासोबत अशाच घटना घडू लागल्या. त्याने पाहिलं की त्याला ज्या महिलांचे मृतदेह नदी किनारी सापडले त्यांच्या अंगावर कपडे नव्हते, त्यांच्यावर अत्याचार झाल्याच्या स्पष्ट खुणा होत्या, हे सर्व पाहून तो हादरला, त्याने आपल्या वरिष्ठाला याबाबत माहिती दिली, मात्र त्याला धमकी देण्यात आली, तू जर याबाबत कोणाला काही सांगितलं तर तुझे देखील असेच हाल होतील, तुझे तुकडे -तुकडे करून तुला मारू त्या भीतीमुळे या कर्मचाऱ्याने कोणालाच काही सांगितलं नाही. त्यानंतर त्याच्या सुपरवाइजरने त्याला या नदीच्या किनारी सापडलेल्या मृतदेहाची विल्हेवाट लावायला सांगितली.
या कर्मचाऱ्यानं केलेल्या दाव्यानुसार भीतीमुळे त्याने शेकडो मृतदेह त्याच पद्धतीनं जमिनीत पुरले. मात्र कोणालाच काही सांगितलं नाही. त्यानंतर त्याच्या मुलीवर देखील जबरदस्ती करण्यात आली, त्यानंतर मात्र त्या 2014 साली हे राज्य सोडलं आणि तो शेजारच्या राज्यात गेला, मात्र आपण मारले जाऊ अशी भीती त्याला सतत वाटत होती, याच भीतीमुळे शेवटी त्याने सर्व हिंमत एकवटून थेट पोलीस स्टेशन गाठलं आपल्या हातातला फोटो पोलिसांना दाखवला तो फोटो एका हाडाच्या सापळ्याचा होता.
त्याने पोलिसांना सर्व हाकिगत सांगितली पुरावे दिले, आणि हे देखील सांगतिलं की मी ज्या महिलेचा मृतदेह पुरला होता. ती जागा उकरून तिच्या मृतदेहाचा हा फोटो मी काढला आहे. त्यानंतर आता या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, ही जमीन खोदण्याची परवानगी आम्ही न्यायालयाकडे मागणार आहोत, अशी माहिती पोलिसांनी या प्रकरणात दिली आहे.
