Rahul Gandhi : …तर नरेंद्र मोदी यांचा दोन ते तीन लाख मतांनी पराभव निश्चित होता, राहुल गांधी यांचा सर्वात मोठा दावा

लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विश्वासार्हता कमी होत असल्याचं गांधी यांनी म्हटलं आहे.

Rahul Gandhi : ...तर नरेंद्र मोदी यांचा दोन ते तीन लाख मतांनी पराभव निश्चित होता, राहुल गांधी यांचा सर्वात मोठा दावा
Follow us
| Updated on: Jun 11, 2024 | 10:06 PM

लोकसभा निवडणुका पार पडल्या असून एनडीए सरकार स्थापन झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. इंडिया आघाडीने भाजपला सत्तेत येण्यापासून रोखलं, मात्र नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना सोबत घेत भाजपने एनडीए सरकार स्थापन केलं. भाजपलाही काही राज्यात कमी प्रमाणात मतदान झालं. मोदी स्वत: एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झाले होते. याचाच धागा पकडत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठा दावा केला आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

प्रियंका गांधी वाराणसीत लढल्या असत्या तर आज भारताच्या पंतप्रधानांचा वाराणसी निवडणुकीत दोन-तीन लाख मतांनी पराभव झाला असता. मी हे अहंकारातून बोलत नाही, कारण भारतातील जनतेने पंतप्रधानांना संदेश दिला आहे की तुमचे राजकारण आम्हाला आवडले नाही आणि आम्ही विरोधात आहोत. आम्ही द्वेषाच्या, हिंसेच्या विरोधात आहोत, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

मी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते आणि सदस्य आणि अमेठी आणि रायबरेलीच्या जनतेचे आभार मानू इच्छितो. यावेळी काँग्रेस पक्ष अमेठी, रायबरेली, उत्तर प्रदेश आणि संपूर्ण देशात एकदिलाने लढला.तुम्ही संपूर्ण देशाचे राजकारणच बदलून टाकले आहे. संविधानाला हात लावला तर बघा जनता काय करतील, असा संदेश जनतेने देशाच्या पंतप्रधानांना दिला असल्याचं राहुल गांधी म्हणाले.

पाहा व्हिडीओ:-

दरम्यान, राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी राहुल गांधी यांनी विजय मिळवला. रायबरेली मतदारसंघात त्यांनी सभा आयोजित केली होती. यावेळी बोलताना त्यांनी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विश्वासार्हता कमी होत असल्याचं गांधी म्हणाले.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.