AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शक्ती असेल तर जगाला प्रेमाची भाषा कळते…,’ भारत-पाक तणावादरम्यान RSS प्रमुख मोहन भागवत यांचे वक्तव्य

जयपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी सांगिलते की प्रेमाची भाषा जगाला तेव्हाच ऐकू येते जेव्हा तुमच्याकडे शक्ती असेल. भारताची प्राचीन संस्कृती, त्यागाची परंपरा आणि विश्व कल्याणासाठी या शक्तीची गरज असल्याचेही ते म्हणाले.

'शक्ती असेल तर जगाला प्रेमाची भाषा कळते...,' भारत-पाक तणावादरम्यान RSS प्रमुख मोहन भागवत यांचे वक्तव्य
mohan bhagwat
| Updated on: May 17, 2025 | 5:31 PM
Share

भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव सुरु असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ( आरएसएस ) प्रमुख मोहन भागवत यांचे एक महत्वाचे वक्तव्य समोर आले आहे. जयपूरातील एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ( आरएसएस ) प्रमुख मोहन भागवत म्हणाले की आपल्या ताकद असेल तर जगाला आपण प्रेमाची भाषेत सांगू शकतो, समजावू शकतो. शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषा देखील समजते असेही ते म्हणाले.त्यांनी आपल्या भाषणात भारताची प्राचीन संस्कृती आणि त्यागाच्या परंपरेला उजाळा दिला.ते पुढे म्हणाले की भारताच्या इतिहासात भगवान श्री रामापासून भामाशाह यांच्यासारख्या महान व्यक्तीमत्वांनी त्याग आणि सेवेचे नवा इतिहास घडवला आहे.

मोहन भागवत पुढे म्हणाले की जगाला धर्माची शिकवण देणे भारताचे कर्तव्य आहे. धर्माच्या आधारेच मानवतेचे उन्नती शक्य आहे. त्यांनी हिंदू धर्माबद्दल माहिती देताना सांगितले की विश्वकल्याण हाच आमचा प्रमुख धर्म आहे. त्यांनी भारता देशाला सर्वात प्राचीन असल्याचे सांगत भारताची भूमिका मोठ्या भावासारखी असल्याचे सांगितले.

विश्वात शांती आणि सौहार्द कायम राहण्यासाठी कार्यरत!

भारत जगात शांती आणि सौहार्द कायम राखण्याच्या दिशेने निरंतर कार्यरत आहे. भारत कोणाचा द्वेष ठेवत नाही. परंतू जर आपल्याकडे शक्ती नसेल तर हे जग प्रेमाची आणि मांगल्य, सौहार्दाची भाषा समजत नाही. त्यामुळे या जगाचे कल्याण करण्यासाठी देखील आपल्याकडे शक्ती असणे आवश्यक आहे. आणि भारताची ताकद जगाने पाहीली आहे असेही मोहन भागवत यांनी यावेळी सांगितले.

शक्ती हेच एक माध्यम आहे!

मोहन भागवत पुढे असेही म्हणाले की शक्ती हेच ते माध्यम आहे. ज्यामुळे जगात भारत आपली बाजू प्रभावीपणे मांडू शकतो. आणि सांस्कृतिक वारशाचा प्रसार आपण तेव्हाच करु शकू जेव्हा आपल्याकडे ताकद असेल, ही जगाची रितच आहे तिला आपण बदलू शकत नाही असे आपण आधीच सांगितले आहे. यावेळी त्यांनी संत समाजाची भूमिकेची प्रशंसा केली आणि ते म्हणाले की संत आणि ऋषीमुनी परंपरा राबवून संस्कृती आणि धर्माचे रक्षण करत आहेत.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक